Appeal to Modi, stop rain water and get water! | मोदींचे आवाहन, पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा!
मोदींचे आवाहन, पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा!

नवी दिल्ली : अनेक राज्यांच्या ग्रामीण भागांत उन्हाळ्यात निर्माण होणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सरपंचांना व्यक्तिगत पत्र लिहून पावसाचे पाणी अडविण्याचे आणि जिरविण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
पंतप्रधानांनी प्रत्येक सरपंचाच्या नावे स्वत:च्या स्वाक्षरीने लिहिलेली ही पत्रे सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली असून, त्यांच्याकडून ती गावोगाव सरपंचांना पोहोचवली जात आहेत.

प्रत्येक सरपंचाशी आणि ग्रापंचायत सदस्याशी व्यक्तिगत संवाद साधण्याच्या भाषेत लिहिलेल्या या पत्रात मोदी लिहितात की, आता पावसाळा तोंडावर आला आहे. परमेश्वराच्या कृपेने आपल्या देशात मुबलक पाऊस पडतो. देवाच्या दयेने पावसाळ्यात मिळणारे हे पाणी, वर्षाच्या नंतरच्या महिन्यांत उपलब्ध व्हावे यासाठी जास्तीत जास्त पाणी अडविण्याचे व जिरविण्याचे हरतºहेचे प्रयत्न आणि व्यवस्था आपण सर्वांनी करायला हवी.

काय म्हटले आहे पत्रात?
सरपंचांनी ग्रामसभा भरवून त्यात हे पत्र सर्वांना वाचून दाखवावे आणि पावसाचे पाणी अडविण्यासाठी गावात काय व्यवस्था करता येईल, यावर सर्वांनी मिळून चर्चा करावी. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी तुम्ही सर्वजण शक्य ते सर्व प्रयत्न कराल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. 
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी गावांमध्ये योग्य ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व गावतळी बांधण्याची सूचनाही मोदींनी या पत्रात केली आहे. जलसंधारण योजनांचा आढावा नव्या मोदी सरकारमध्ये हाच हेतू डोळ्यापुढे ठेवून ‘जलशक्ती’ हे स्वतंत्र
खाते निर्माण करण्यात आले आहे. या मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आंतरराज्य मंत्रीस्तरीय बैठकीत देशाच्या विविध भागांतील पाणीटंचाई व राज्यांकडून राबविल्या जाणाºया जलसंधारण योजना यांचा आढावा घेतला.


Web Title: Appeal to Modi, stop rain water and get water!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.