महापालिकेतर्फे धोकादायक इमारतींचा सर्व्हे जुन्या इमारतींच्या रिस्ट्रक्चरसाठी अर्ज करण्याचे आवाहन
By Admin | Updated: May 9, 2014 19:26 IST2014-05-09T19:26:57+5:302014-05-09T19:26:57+5:30
कोल्हापूर : शहरातील धोकादायक इमारतींमध्ये दरवर्षी वाढच होत आहे. महापलिकेच्या दप्तरी असलेल्या धोकादायक इमारतींपेक्षा प्रत्यक्षात हा आकडा किमान दोनशेच्या पुढे असल्याचा दावा स्थापत्यतज्ज्ञ करतात. रहिवासी व व्यावसायिक वापरात असलेल्या या जुन्या इमारतींच्या रिस्ट्रक्चर आराखडा सादर करून भक्कमतेचा पुरावा घेण्याचे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.

महापालिकेतर्फे धोकादायक इमारतींचा सर्व्हे जुन्या इमारतींच्या रिस्ट्रक्चरसाठी अर्ज करण्याचे आवाहन
क ल्हापूर : शहरातील धोकादायक इमारतींमध्ये दरवर्षी वाढच होत आहे. महापलिकेच्या दप्तरी असलेल्या धोकादायक इमारतींपेक्षा प्रत्यक्षात हा आकडा किमान दोनशेच्या पुढे असल्याचा दावा स्थापत्यतज्ज्ञ करतात. रहिवासी व व्यावसायिक वापरात असलेल्या या जुन्या इमारतींच्या रिस्ट्रक्चर आराखडा सादर करून भक्कमतेचा पुरावा घेण्याचे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात जाहीर प्रकटीकरण व जनरल सर्व्हे करून शहरातील धोकादायक इमारती निवडल्या जातात. २०११ मध्ये या सर्व्हेतून ६४ व २०१२ मध्ये ६९ तर २०१३ मध्ये ९० इमारती धोकादायक ठरल्या होत्या. गेल्यावर्षी महापालिकेच्या बांधकाम विभागाने ९० पैकी २६ धोकादायक इमारती पाडल्या. ५० हून अधिक इमारती दुरूस्त करून घेण्यास भाग पाडले. ८-१० इमारती मालक व कुळ यांच्या वादात अडकल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पुन्हा धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे. जुन्या इमारत मालकांनी महापालिकेच्या विभागीय बांधकाम कार्यालयात संपर्क साधून इमारतीचा स्ट्रक्चर आराखडा सादर करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.=======================इथे आहेत इमारतीशिवाजी पेठ, ताराबाई रोड, महाद्वार रोड, उत्तरेश्वर पेठ, रविवार पेठ, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरीचा काही भागात मोठ्या संख्येने धोकादायक इमारती आहेत. ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचा सर्व्हे केला जाणार आहे. धोकादायक इमारतींना नोटीस देऊन, मुंबईतील गेल्या क ाही वर्षांत सातत्याने धोकादायक इमारती पडून मोठ्या प्रमाणात जीवितहानीचे प्रकार घडल्याने महापालिकेतर्फे कडक कारवाई केली जाते. ==============================================शहरातील नव्याने बांधकाम सुरू असलेली तसेच पूर्ण झालेल्या इमारतींपैकी एकही इमारत धोकादायक नाही. शहरात कुठेही विनापरवाना तसेच अवैध जागेवर मोठे बांधकाम झालेले नाही किंवा सुरू नाही. कुळ व मालक यांच्यात वादातील इमारतींवर कारवाई करण्याचे राहिले आहे. यावर्षी प्रत्येक वॉर्डात किमान दहाप्रमाणे ४०हून अधिक धोकादायक इमारती असण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी या इमारतींवर कारवाई करून रिस्ट्रक्चर करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा राहील. - नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता, महापालिका)=================================================जुन्या इमारतीचा प्रतीकात्मक फोटो वापरावा