अतिरेकी सोडल्याबद्दल मागितली माफी
By Admin | Updated: June 5, 2014 00:31 IST2014-06-05T00:31:19+5:302014-06-05T00:31:19+5:30
अमेरिकन सैनिकाची सुटका करण्यासाठी त्याच्या मोबदल्यात पाच तालिबानी दहशतवादी सोडण्याचा निर्णय अध्यक्ष ओबामा यांनी सिनेट सदस्यांना अंधारात ठेवून घेतला.

अतिरेकी सोडल्याबद्दल मागितली माफी
>वॉशिंग्टन : अमेरिकन सैनिकाची सुटका करण्यासाठी त्याच्या मोबदल्यात पाच तालिबानी दहशतवादी सोडण्याचा निर्णय अध्यक्ष ओबामा यांनी सिनेट सदस्यांना अंधारात ठेवून घेतला. त्यावर वाद निर्माण झाल्यामुळे व्हाईट हाऊसने माफीनामा प्रसिद्ध केला आहे.
सिनेटच्या गुप्तचर समितीच्या अध्यक्षा व अध्यक्ष ओबामा यांच्या डेमोक्रॅट पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या डायना फेनिस्टिन यांच्या मते या व्यवहाराची पूर्वकल्पना काँग्रेसला न देऊन व्हाईट हाऊसने अमेरिकेतील कायद्याचा भंग केला आहे. सैनिकाची मुक्तता करण्यासाठी पाच तालिबानी दहशतवाद्यांची सुटका करताना कोणतीही सल्लामसलत करण्यात आली नाही, त्यामुळे काही सिनेट सदस्य आश्चर्यचकित झाले आहेत , तर काहीजणांची निराशा झाली आहे. हा निर्णय अमेरिकन कायद्याचा थेट भंग आहे. आम्ही फारच निराश झालो आहोत.
फेनिस्टिन यांनी आपल्या वक्तव्यात दोन्ही सदस्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बर्गडहल या सैनिकाची मुक्तता करण्यासाठी पाच कट्टर दहशतवादी सोडणो योग्य आहे काय? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
हा वाद गुंडाळण्यासाठी व्हाईट हाऊसच्या ज्येष्ठ अधिका:यांनी सोमवारी रात्री गुप्तचर समितीतील ज्येष्ठ रिपब्लिकन सदस्य सॅक्सी चाम्ब्लीस यांना बोलावले व दहशतवाद्यांना सोडण्याच्या निर्णयाची पूर्वकल्पना न दिल्याबद्दल माफी मागितली. उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टोनी ब्लिनकिन यांनी फेनस्टिन यांना भेटून या प्रकरणी माफी मागितली आहे. (वृत्तसंस्था)