संस्कृती जोपासणे आवश्यक अपर्णा रामतीर्थकर यांचे मत; बोर्डी येथे व्याख्यान
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:34+5:302015-02-14T23:51:34+5:30
बोर्डी : आधुनिक काळात बदललेली संस्कृती जोपासणे आवश्यक असल्याचे मत अपर्णा रामतीर्थकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. त्या नागास्वामी संस्थानात बोर्डी ग्रामपंचायतीच्या विद्यमाने व श्री गुरुदेव विद्यामंदिर बोर्डी यांच्या सौजन्याने आयोजित व्याख्यानात बोलता होत्या.

संस्कृती जोपासणे आवश्यक अपर्णा रामतीर्थकर यांचे मत; बोर्डी येथे व्याख्यान
ब र्डी : आधुनिक काळात बदललेली संस्कृती जोपासणे आवश्यक असल्याचे मत अपर्णा रामतीर्थकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. त्या नागास्वामी संस्थानात बोर्डी ग्रामपंचायतीच्या विद्यमाने व श्री गुरुदेव विद्यामंदिर बोर्डी यांच्या सौजन्याने आयोजित व्याख्यानात बोलता होत्या. स्त्रीने स्त्रीचा सन्मान करावा व मुलींवर लक्ष देण्याची प्रथम जबाबदारी आईने पार पाडावी, असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना आतकड होत्या, तर मंचावर प्रमुख अतिथी प्रा. ठाकरे, शाळा समिती व नागास्वामी संस्थानचे अध्यक्ष मनोहरराव गये, मुख्याध्यापक बी.जी. बुंदे, सदस्य काशीनाथ ताडे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रकाश आतकड, माजी जि. प. सदस्या नलिनी लटकुटे, डॉ. संजय महल्ले, ग्रामसेवक डी. एम. पोधाडे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल जयस्वाल, बीट जमादार बापूराव नवथडे यांच्यासह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते. संचालन एम.एन. बद्रे, प्रास्ताविक मीना महल्ले व आभारप्रदर्शन उपसरपंच संजय ताडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री गुरुदेव विद्यामंदिराचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)फोटो : १३एकेटीपी१२.जेपीजी.............