पाकिस्तानला धडकी भरणार; भारतीय लष्कराला मिळाले शक्तिशाली Apache हेलिकॉप्टर, जाणून घ्या खासियत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:43 IST2025-07-22T15:42:44+5:302025-07-22T15:43:56+5:30

Apache Helicopters: या हेलिकॉप्टरची पहिली तुकडे राजस्थानमध्ये पाकिस्तानी सीमेजवळ तैनात असेल.

Apache Helicopters: Will give a shock to Pakistan; Indian Army gets powerful Apache helicopter, know its special features... | पाकिस्तानला धडकी भरणार; भारतीय लष्कराला मिळाले शक्तिशाली Apache हेलिकॉप्टर, जाणून घ्या खासियत...

पाकिस्तानला धडकी भरणार; भारतीय लष्कराला मिळाले शक्तिशाली Apache हेलिकॉप्टर, जाणून घ्या खासियत...

Apache Helicopters: भारतीय सैन्याला मजबूत करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून, आता भारतीय लष्कराला Apache AH-64E लढाऊ हेलिकॉप्टरची पहिली तुकडी मिळाली आहे. ही राजस्थानमधील जोधपूर एअरबेसवर तैनात असेल. पूर्वी हे हेलिकॉप्टर फक्त भारतीय हवाई दलाकडे होते. आता या शक्तिशाली हेलिकॉप्टरच्या तैनातीमुळे पश्चिम सीमेवर जलद प्रतिसाद देण्याची क्षमता लष्कराला मिळाली आहे.

या हेलिकॉप्टरच्या तैनातीमुळे भारताची धोरणात्मक रणनीती बदलण्याची क्षमता आहे. या निर्णयावरुन असे दिसून येते की, भारतीय लष्कर आता मल्टी-डोमेन ऑपरेशन्सकडे वाटचाल करत आहे, ज्यात लष्कर आणि हवाई दल यांच्यात समन्वय खूप महत्त्वाचा आहे.

प्रगत सेन्सर्स आणि नाईट व्हिजन सिस्टमने सुसज्ज
अपाचे हेलिकॉप्टरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्याची प्रगत सेन्सर सिस्टम. हे नाईट व्हिजन आणि थर्मल इमेजिंग सेन्सर्सने सुसज्ज आहे, जे रात्रीच्या अंधारात आणि खराब हवामानातही शत्रूला अचूकपणे ओळखू शकते. याची टार्गेट अ‍ॅक्विझिशन सिस्टम आणि पायलट नाईट व्हिजन सेन्सर (PNVS) पायलटला कमी दृश्यमानतेतही अचूकपणे हल्ला करण्याची क्षमता देते.

रडार आणि कम्युनिकेशन सिस्टीम
हे हेलिकॉप्टर AN/APG-78 लाँगबो रडार आणि जॉइंट टॅक्टिकल इन्फॉर्मेशन डिस्ट्रिब्यूशन सिस्टीम (JTIDS) ने सुसज्ज आहे, ज्यामुळे ते नेटवर्क-केंद्रित युद्धात उपयुक्त ठरते. ते CDL आणि Ku फ्रिक्वेन्सी बँडवरील डेटा ट्रान्सफर करण्यास देखील सक्षम आहे.

अनक ठिकाणी हल्ले करण्यास सक्षम
अपाचेवर बसवलेली शस्त्रे कोणत्याही युद्धभूमीत शत्रुवर हल्ला करण्यास सक्षम आहेत.

AGM-114 हेलफायर क्षेपणास्त्र: टँक आणि बख्तरबंद वाहने नष्ट करण्यास सक्षम.

हायड्रा ७० रॉकेट्स: ७० मिमी अनगाइडेड रॉकेट्स, जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करतात.

स्टिंगर क्षेपणास्त्रे: हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे.

स्पाइक NLOS क्षेपणास्त्रे: २५+ किमी पर्यंतच्या लक्ष्यांवर हल्ले करू शकते.

हे हेलिकॉप्टर एका मिनिटात १२८ लक्ष्यांना लॉक करू शकते आणि १६ वेगवेगळ्या लक्ष्यांवर हल्ला करू शकते. 

उड्डाण क्षमता
अपाचे हेलिकॉप्टरचा कमाल वेग २८० ते ३६५ किमी/तास आहे. हे एका वेळी ३.५ तासांपर्यंत उड्डाण करू शकते आणि त्याची ऑपरेशनल रेंज ५०० किमी पर्यंत आहे. 

Web Title: Apache Helicopters: Will give a shock to Pakistan; Indian Army gets powerful Apache helicopter, know its special features...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.