CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:04 IST2025-05-06T15:04:16+5:302025-05-06T15:04:16+5:30

Government Job: गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडीमध्ये करिअर करायची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

AP Home Guard Recruitment 2025: Eligibility, Application Process, and Dates - Check Details Here | CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!

CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!

गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडीमध्ये करिअर करायची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने नुकतीच होमगार्ड पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली. या भरतीसाठी १ मे २०२५ पासून भरती प्रकिया सुरु झाली असून १५ मे २०२५ अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असेल.  यामुळे इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह अर्ज वेळेवर विहित पत्यावर पाठवावेत. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

शैक्षणिक पात्रता
गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे जाहीर केलेल्या होमगार्डच्या पदांसाठी इच्छुक असलेला उमेदवार १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  याशिवाय, उमेदवाराला संगणक चालवण्याचे ज्ञान असणे गरजेच आहे. तसेच उमेदवार मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे अनिवार्य आहे.

वय
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे ठेवण्यात आली आहे, जी १ मे २०२५ च्या आधारावर मोजली जाईल. या पदासाठी पुरुषांसह महिला देखील अर्ज करू शकतात.  पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची १६० सेमी आणि महिला उमेदवारांसाठी १५० सेमी निश्चित करण्यात आली. 

आवश्यक कागदपत्रे
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रेही जोडावी लागतील. उमेदवाराला अर्जासह दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका, इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे, निवास आणि जातीचे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, संगणक प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो पाठवावी लागतील. ही सर्व कागदपत्रे अर्जासह योग्य क्रमाने शेवटच्या तारखेअगोदर विहित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या लेखी परीक्षेला बसण्याची आवश्यकता नाही. सर्वात प्रथम उमेदवारांचे अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. याशिवाय, उमेदवारांची शारीरिक मापन आणि कौशल्य चाचणी केली जाईल.

पगार
निवडलेल्या उमेदवारांना प्रतिदिन ७१० रुपये दराने वेतन मिळेल. ही भरती केवळ आंध्र प्रदेश सीआयडीसाठी केली जात आहे, ज्यामध्ये इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज संबंधित कागदपत्रांसह स्पीड पोस्टद्वारे विहित पत्त्यावर पाठवावे लागेल.

Web Title: AP Home Guard Recruitment 2025: Eligibility, Application Process, and Dates - Check Details Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी