शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: "राहुल जी शून्य तपासून घ्या"; भाजप खासदाराने वाचून दाखवला काँग्रेसच्या अपयशाचा पाढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 21:08 IST

माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

Anurag Thakur On Rahul Gandhi: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी हे भाजपच्या निशाण्यावर आहेत. संसदेतही अर्थसंकल्पीय अधिवेशनावरील चर्चेदरम्यानही भाजप खासदारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. माजी मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी यांचा उल्लेख करत अनुराग ठाकूर यांनी एक पोस्टर दाखवलं. पोस्टर दाखवत अनुराग ठाकूर यांनी राहुलजींनी शून्य तपासावे, असं म्हटलं. यावेळी अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाचाही उल्लेख केला. अनुराग ठाकूर यांच्या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे हिमाचल प्रदेशचे खासदार अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सरकारच्या कामगिरीची लेखाजोगा मांडत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जेव्हा पंतप्रधान मोदींनी मध्यमवर्गीयांना दिलासा दिला, तेव्हा विरोधकांच्या पोटात दुखू लागले. त्यांना वाटले की आता आपली मते हिसकावून घेतली जातील, असं अनुराग ठाकूर म्हणाले. त्यानंतर ठाकूर यांनी एक पोस्टर काढले. त्यावर १२००००० रुपये करमुक्त असल्याचा उल्लेख होता. अनुराग ठाकूर यांनी हे दाखवून राहुल जी शून्य तपासून घ्या, असं म्हटलं.  यावर भाजपचे सर्व खासदार जोरात हसले.

यानंतर या शून्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे, असं अनुराग ठाकूर म्हणाले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी बोलण्याचा प्रयत्न करता अनुराग ठाकूर यांनी. तुम्हाला हे आवडत नसेल तर आम्ही सोडून देतो. मात्र हे कोट्यवधी मध्यमवर्गीयांना आनंद देणारे आहे. देशाच्या विकासात हातभार लावणार आहे. पण अजून एक शून्य आहे, असं म्हटलं.

यानंतर अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. "२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला किती जागा दिल्या, भाजप खासदार म्हणाले शून्य. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला किती जागा दिल्या शून्य, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा दिल्या शून्य, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला किती जागा दिल्या शून्य. २०२४ च्या लोकसभेत किती जागा दिल्या तर शून्य आणि आता २०२५ च्या विधानसभेत किती जागा दिल्या शून्य. विक्रमी शून्य मिळण्याचे काम जर कोणी केले असेल तर तो राहुल गांधींचा पक्ष काँग्रेस आहे," असं अनुराग ठाकूर म्हणाले.

दरम्यान, यावेळी अनुराग ठाकूर यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावरही निशाणा साधला. "दिल्ली निवडणुकीच्या निकालाने दिल्लीतील जनतेने दिल्ली आपत्तीमुक्त केल्याचे दिसून आले आहे. ही केवळ घोषणा नाही पंतप्रधान मोदी दिल्लीच्या हृदयात राहतात. दिल्लीतील जनतेला आपदाच्या लूटीतून मुक्तता मिळाली आहे. दिल्लीच्या जनतेने १० वर्षांच्या कुशासन आणि प्रदूषणातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला आहे," असं ठाकूर म्हणाले.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Anurag Thakurअनुराग ठाकुरRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल