दिल्लीतील आघाडीबाबत अँटोनी समिती घेणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 04:39 IST2019-03-06T04:39:57+5:302019-03-06T04:39:59+5:30

काँग्रेस दिल्लीत आम आदमी पक्षासोबत कोणतीही निवडणूक आघाडी करणार नाही.

Antony committee to decide on Delhi's leadership | दिल्लीतील आघाडीबाबत अँटोनी समिती घेणार निर्णय

दिल्लीतील आघाडीबाबत अँटोनी समिती घेणार निर्णय

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : काँग्रेस दिल्लीत आम आदमी पक्षासोबत कोणतीही निवडणूक आघाडी करणार नाही. हा निर्णय मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्याच्या नेत्यांशी चर्चेनंतर घेतला. परंतु, पक्षाच्या सूत्रांनी दावा केला की, दिल्ली प्रदेशच्या ज्येष्ठ नेत्यांनी युती करण्यास नकार दिल्यानंतर बैठकीतील चर्चेत दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष शीला दीक्षित आणि अजय माकन यांच्यात वादही झाला. आता आघाडी करायची की नाही या प्रश्नाला ए. के. अँटोनी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पाठवण्याची तयारी केली जात आहे.

Web Title: Antony committee to decide on Delhi's leadership