शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Coronavirus: “कोरोना संकटकाळात भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही”: अमेरिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 9:50 AM

Coronavirus: भारताने आम्हाला मदत केली, या मदतीची परतफेड अमेरिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताला केलेल्या मदतीत आम्ही पूर्ण केली.

नवी दिल्ली: अमेरिकेत सत्तांतर झाल्यानंतर जो बायडेन सरकारचे कामकाज सुरू झाले. बायडेन यांनी सत्ताग्रहण केल्यानंतर प्रथमच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन (Antony Blinken) भारत दौऱ्यावर आले आहेत. ब्लिंकन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jayshankar) यांची भेट घेतली. यावेळी  कोरोना संकटकाळात भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही, असे ब्लिंकन यांनी नमूद केले. (antony blinken said america can not forget india aid in corona situation)

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

कोरोनाचा भारत व अमेरिका या दोन्ही देशांना मोठा फटका बसला. या काळात भारताने आम्हाला मदत केली, या मदतीची परतफेड अमेरिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताला केलेल्या मदतीत आम्ही पूर्ण केली, असे सांगत ब्लिंकन यांनी भारताला कोरोना लसीसाठी २.५ कोटी डॉलरची मदत देण्याची घोषणा केली. तसेच भारत आणि अमेरिकेचे संबंध दृढ करण्यावर भर असल्याचेही ते म्हणाले. 

आता लसींचे दर वाढले; कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नवे दर जाणून घ्या

दुसऱ्या लाटेत अमेरिकेचीही मदत मोलाची ठरली

जागतिक व प्रादेशिक आव्हाने पेलण्यासाठी दोन्ही देशांनी मोठे काम केले आहे. बायडेन प्रशासनाने लस उत्पादनात भारताला कच्चा माल पुरवून मदत केली, त्याबाबत भारत अमेरिकेचा आभारी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अमेरिकेची मदत मोलाची ठरली. विद्यार्थ्यांना व्हिसा देण्याच्या संदर्भातही अमेरिकेने कोरोना काळात संवेदनशीलता दाखवली असल्याचे भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी नमूद केले. 

“राहुल गांधींच्या मोबाइलमध्ये असं काय आहे की ते फॉरेंसिक चाचणीला घाबरतायत”

डोभाल आणि ब्लिंकन यांच्यातील चर्चा गुलदस्त्यात

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही, परंतु अफगाणिस्तानातील परिस्थिती, द्विपक्षीय संबंध याबाबत चर्चा झाल्याचा अंदाज असल्याचे सांगितले जात आहे. तसेच हिंद-प्रशांत क्षेत्रातील घडामोडी तसेच सहकार्यावर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. ब्लिंकन यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत व अमेरिका हे दोन्ही देश लोकशाही मूल्यांसाठी वचनबद्ध असून दोन्ही देशातील संबंधांचा तो मूळ आधार आहे. आपण नागरी समुदायाच्या काही नेत्यांना भेटलो असून लोकशाही मूल्यांच्या पालनासाठी नागरी समुदाय मदत करीत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतAjit Dovalअजित डोवालAmericaअमेरिका