पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 13:12 IST2025-04-27T12:54:09+5:302025-04-27T13:12:03+5:30
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या केली. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हल्ला केलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याचा रविवारी मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी कांदिखास परिसरात घ रसूल मगरे असे ओळखल्या जाणाऱ्या ४५ वर्षीय नागरिकाची त्याच्या घराजवळ अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली.
मगरे यांच्या पोटात आणि डाव्या मनगटात गोळी लागली, त्यांना तातडीने हंडवाडा रुग्णालयात दाखल केले, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत सामाजिक कार्यकर्त्याचा राजकीय संबंध माहित नाही आणि पोलीस नागरिकाच्या हत्येमागील नेमकी कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
दरम्यान, दहशतवाद्यांवर आणि दहशतवाद्यांशी संबंध असलेल्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू ठेवत, सुरक्षा दलांनी बांदीपोरा जिल्ह्यातील छोटीपोरा गावात एका दहशतवाद्याचे आणखी एक घर उद्ध्वस्त केले. ज्या दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली आहेत त्यात लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी आहेत.
अहसान उल हकने २०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले
आदिल हुसैन ठोकर, झाकीर अहमद गनई, अमीर अहमद दार आणि आसिफ शेख, शाहिद अहमद कुट्टे, अहसान उल हक अमीर, जैश-ए-मोहम्मदचे अमीर नजीर वानी, जमील अहमद शेर गोजरी, अदनान साफी दार आणि द रेझिस्टन्स फ्रंटचे फारुख अहमद टेडवा. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अहसान उल हकने २०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले आणि अलीकडेच तो खोऱ्यात 'घुसखोरी' करत होता.
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर शाहिद अहमद कुट्टे हा अनेक देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहे, झाकीर अहमद घनी पण अनेक कारवायांमध्ये सहभागी आहे. फारुख अहमद तेडवा पाकिस्तानमधून काम करत होता. मंगळवारी झालेल्या हल्ल्यात ठोकरचा थेट हात असल्याचा संशय आहे.
१० दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त
जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी ही करावाई केली आहे. २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन मैदानावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आतापर्यंत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची १० घरे पाडण्यात आली आहेत. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला.