CoronaVirus: कोरोनाचा मुकाबला करू शकतात HIV वरची दोन औषधं?; उत्पादन वाढवण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 12:48 PM2020-03-13T12:48:11+5:302020-03-13T12:55:04+5:30

कोरोनाच्या रुग्णांवर HIVसाठी वापरण्यात येणारी औषधं Lopinavir अन् Ritonavirचा चांगला प्रभाव पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं फॉर्मा कंपन्यांना दोन्ही औषधांचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

anti hiv drugs lopinavir and ritonavir effective in covid 19 coronavirus patients vrd | CoronaVirus: कोरोनाचा मुकाबला करू शकतात HIV वरची दोन औषधं?; उत्पादन वाढवण्याच्या सूचना

CoronaVirus: कोरोनाचा मुकाबला करू शकतात HIV वरची दोन औषधं?; उत्पादन वाढवण्याच्या सूचना

Next
ठळक मुद्देकोरोनावर कोणतंही औषध उपलब्ध नसल्यानं याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. भारतातही कोरोनानं एका 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता भारतीय वैद्यकीय तज्ज्ञांनी या विषाणूवर उपचार शोधण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर HIVसाठी वापरण्यात येणारी औषधं Lopinavir अन् Ritonavirचा चांगला प्रभाव पडत आहे.

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीन, इटली अन् दक्षिण कोरियाला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनावर कोणतंही औषध उपलब्ध नसल्यानं याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. भारतातही कोरोनानं एका 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता भारतीय वैद्यकीय तज्ज्ञांनी या विषाणूवर उपचार शोधण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोना व्हायरस (Covid-19)वर लस विकसित करण्यासाठी वर्ष ते दीड वर्षं लागू शकतात, असा दावा या वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. त्यातच आणखी एक चांगली माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या रुग्णांवर HIVसाठी वापरण्यात येणारी औषधं Lopinavir अन् Ritonavirचा चांगला प्रभाव पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं फॉर्मा कंपन्यांना दोन्ही औषधांचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
 
बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं औषध कंपन्यांबरोबर मोठी बैठक घेतली होती. या बैठकीत वैद्यकीय तज्ज्ञांनी सिपला, मायलन, ऑरोबिंदो आणि इतर कंपन्यांना एचआयव्हीवर रामबाण ठरणाऱ्या औषधांचं उत्पादन वाढवण्याचा सल्ला दिला आहे. Lopinavir अन् Ritonavirचं अँटी रेट्रोवायरल औषधं आहेत. ही औषधं एचआयव्हीला शरीरातल्या इतर नसांमध्ये पसरण्यापासून रोखतात. भारत सध्या दोन्ही औषधांची निर्यात आफ्रिकी देशात करतो. 

इकोनॉमिक्स टाइमच्या हवाल्यानुसार मंत्रालयातले अधिकारी म्हणाले, कंपन्यांना दोन्ही औषधांचा पुरवठा आणि उत्पादन वाढवण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच या औषधांच्या निर्यातीवर कोणतीही बंधनं लादण्यात आलेली नाहीत. इटलीतून भारतात आलेल्या दाम्पत्यावर उपचारासाठी Lopinavir अन् Ritonavirचा वापर करण्यात आला. जयपूरमधल्या या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या दोन्ही औषधांच्या वापरानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात काही प्रमाणात यश येत असल्याचं उघड झालं आहे. 
 
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डीजी डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, दोन्ही औषधे या जोडप्याच्या संमतीने दिली गेली आहेत. त्याचा परिणाम चांगला झाला. 14 दिवसांनंतर ते आता जवळजवळ निरोगी आहेत. भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने आयसीएमआरला परवानगी दिली आहे की, एचआयव्ही-विरोधी औषधे Covid-19वरच्या उपचारांसाठी वापरता येतील. कोरोना विषाणूचा सध्या कोणताही इलाज उपलब्ध नाही.

Web Title: anti hiv drugs lopinavir and ritonavir effective in covid 19 coronavirus patients vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.