जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एका सरपंचाची हत्या
By Admin | Updated: December 20, 2014 14:00 IST2014-12-20T14:00:11+5:302014-12-20T14:00:31+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच शनिवारी आणखी एका सरपंचाची हत्या करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एका सरपंचाची हत्या
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २० - जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच शनिवारी आणखी एका सरपंचाची हत्या करण्यात आली आहे. सोपोर जिल्ह्यातील बोमाई गावाचे सरपंच गुलाम अहमद भट्ट यांची संशयित दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. भट्ट यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
या महिन्यातील ही दुसरी घटना असून गेल्या दोन महिन्यांत चार सरपंचाची हत्या करण्यात आली आहे. काश्मीरमधील दुस-या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी नॅशनल कॉन्फरन्सच्या एका सरपंचाची हत्या करण्यात आली होती.