शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

बंगालमध्ये आणखी एक नोकरभरती घोटाळा! एम्स भरतीबाबत CBIने भाजप आमदाराच्या मुलीची केली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 21:21 IST

Another recruitment scam in Bengal : बंगालमधील शिक्षण भरती घोटाळ्याची चौकशी आधीच सुरू आहे. यामध्ये ईडीने टीएमसी नेते आणि राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना अटक केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारही ऍक्शन मोडमध्ये दिसत आहे. तिकडे CID ने कल्याणी AIIMS (AIIMS, Kalyani) मधील भरतीसंदर्भात तपास तीव्र केला आहे. या प्रकरणी सीआयडीने आज भाजप आमदार निलाद्री शेखर दाना यांच्या मुलीची अनेक तास चौकशी केली.बंगालमधील शिक्षण भरती घोटाळ्याची चौकशी आधीच सुरू आहे. यामध्ये ईडीने टीएमसी नेते आणि राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना अटक केली आहे.कल्याणी एम्समधील भरतीचे प्रकरण काय आहे?बांकुरा येथील भाजप आमदार निलाद्री शेखर यांच्यावर आपल्या प्रभावाने मुलगी मैत्री दानाला कल्याणी एम्समध्ये नोकरी मिळवून दिल्याचा आरोप आहे. सीआयडीच्या 4 अधिकाऱ्यांनी आज बांकुरा येथील निलाद्री शेखरच्या घरी पोहोचून बराच वेळ चौकशी केली.याप्रकरणी महिनाभरापूर्वी कल्याणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपानुसार, कल्याणी एम्समध्ये भरतीदरम्यान घोटाळा झाला होता आणि सीआयडीने तपास हाती घेताच गेल्या आठवड्यात नादियातील चकडा येथील भाजप आमदार बंकिम घोष यांची सून अनुसया घोष धर हिची चौकशी केली होती. या प्रकरणी भाजपच्या अनेक नेत्यांवर आपल्या प्रभावाचा वापर करून नातेवाईकांना कल्याणी एम्समध्ये नोकरी मिळवून दिल्याचा आरोप होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एफआयआरमध्ये एकूण 8 जणांची नावे आहेत. हा एफआयआर 20 मे रोजी नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात, आयपीसी कलम 420 (फसवणूक), 406, 120-बी (गुन्हेगारी कट) इत्यादी अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. आमदार निलाद्री यांच्या मुलीला डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून ३० हजार रुपये प्रति महिना पगाराची नोकरी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर ती परीक्षा द्यायलाही गेली नव्हती.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालEducationशिक्षणCBIगुन्हा अन्वेषण विभागBJPभाजपा