शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:09 IST

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आणखी एक व्यक्ती सामील असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या व्यक्तीचा राज कुशवाहशी थेट संबंध होता. 

राजा रघुवंशी प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सुरुवातील सोनम आणि राजा बेपत्ता झाले, त्यानंतर राजाचा मृतदेह सापडला आणि हे प्रकरण वेगळ्याच दिशेला गेलं. यानंतर सोनमने आपणच राजाची हत्या घडवून आणल्याचे कबूल केले आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. या प्रकरणात सोनमसह आणखी चार नावं चर्चेत आली होती.  राज कुशवाह, सोनम रघुवंशी, विशाल सिंह चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांची नावे या प्रकरणात समोर आली होती. मात्र, आता यात आणखी एक नाव समोर आले असून, हा व्यक्ती नेमका कोण असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. 

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आणखी एक व्यक्ती सामील असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या व्यक्तीचे नाव जितेंद्र रघुवंशी असून, याचा राज कुशवाहशी थेट संबंध होता. 

जितेंद्रचं राजशी कनेक्शन 

सोनम रघुवंशी हीच कथित प्रियकर राज कुशवाहा हा जितेंद्र रघुवंशी नावाच्या व्यक्तीसोबत हवाला व्यवसाय करत होता. पोलिसांना जितेंद्रच्या नावावर ४ बँक खाती देखील सापडली आहेत, ज्यामध्ये तब्बल लाखो रुपयांचे व्यवहार झाले आहेत. आता या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी पोलीस जितेंद्र रघुवंशीचा शोध घेत आहेत.

सोनम रघुवंशीचा संपूर्ण व्यवसाय राज कुशवाह सांभाळत होता. राज कुशवाह पैशांच्या व्यवहारांचा हिशोब ठेवत होता. याबद्दल सोनम आणि राज यांच्यात अनेकदा बोलणं देखील होत असे. सोनमने राजमार्फत जितेंद्रला काही पैसे दिले असतील आणि ते हवालाद्वारे दुसरीकडे पाठवले असतील, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांसमोर उभे राहिले प्रश्न आता राजा रघुवंशी हत्या प्रकरणात जितेंद्र रघुवंशी याचे नाव समोर आल्यानंतर आता पोलिसांसमोर आणखी काही प्रश्न उभे राहिले आहेत. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहा मार्फत हवाला व्यवसायही केला का? सोनमने दुसरीकडे पैसे पाठवण्यासाठी हवालाची मदत घेतली का? हवालाद्वारे पैसे पाठवून सोनम राजासोबत दुसरीकडे कुठेतरी जाण्याचा विचार करत होती का? जितेंद्र रघुवंशी यांचा राज कुशवाह आणि सोनमशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.

राज कुशवाहाने सोनमच्या या व्यवसायातून ५० हजार रुपये घेतले होते आणि ते त्याच्या मित्रांना दिले होते. हेच पैसे घेऊन तिघे आरोपी शिलाँगला पोहोचले होते. आता पोलीस जितेंद्र रघुवंशीचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू