शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Seema Haider: सीमा हैदरचा आणखी एक प्रियकर आला समोर, तिच्या भारतात जाण्याच्या हेतूबाबत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 15:28 IST

Seema Haider Love Story: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर ही महिला मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या भारतात येण्यावरून आणि सचिनसोबत विवाह करून हिंदू धर्म स्वीकारण्यावरू पाकिस्तानमध्ये खळबळ माजलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधूनभारतात आलेली सीमा हैदर ही महिला मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या भारतात येण्यावरून आणि सचिनसोबत विवाह करून हिंदू धर्म स्वीकारण्यावरू पाकिस्तानमध्ये खळबळ माजलेली आहे. सीमाबद्दल पाकिस्तानी मीडिया आणि सोशल मीडियामध्ये वेगवेगळे दावे केले जात आहेत. तर भारतात सचिन आणि सीमाची लव्हस्टोरी आणि तिच्या देशातील अवैध प्रवेशाची चर्चा होत आहे. कुणी तिला पाकिस्तानी एजंट म्हणत आहे. तर कुणी तिच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत आहे. परिस्थिती अशी आहे की, सध्या सीमा हैदर ही ट्रेंडिंग टॉपिक बनलेली आहे.

चार मुलांची आई असलेल्या सीमा हैदर आणि सचिन यांच्या विवाहानंतर या अजब प्रेमकहाणीमध्ये सीमा हिचा पती गुलाम याची एंट्री झाली होती. तो सध्या सौदी अरेबियामध्ये नोकरी करत आहे. मी सीमावर खूप प्रेम करतो. तसेच ती परत आल्यास तिचा स्वीकार करून तिला आपल्यासोबत सौदी अरेबियामध्ये घेऊन जाईन, कारण तिच्या जीवाला धोका आहे, असे त्याने सांगितले.

दरम्यान, सीमाचा आणखी एक कथित माजी प्रियकरही समोर आला आहे. त्याने सीमा ही भारतातून परत येईल, असा दावा केला आहे. तसेच ती भारतातून परत कधी येईल, त्याची वेळही तो सांगत आहे. काही यूट्युब चॅनलवर त्याची माहिती दिली जात आहे.

या व्यक्तीने सांगितले की, तो सुद्धा पब्जीच्या माध्यमातून सीमाच्या संपर्कात आला होता. दोन वर्षांपासून दोघेही एकमेकांना ओळखतो. तसेच आम्ही लग्नही करणार होतो. मात्र ते होऊ शकलं नाही. पाकिस्तानमधून भारतात जाण्यामागे सीमाचा खास उद्देश आहे. तो पूर्ण झाल्यावर ती परत पाकिस्तानमध्ये येईल. या पाकिस्तानी तरुणाने सांगितले की, सीमा हैदरला क्रिकेट खूप आवडते. तिला भारतामध्ये वर्ल्डकप सामना पाहायचा आहे. तो पाहिल्यावर ती पती गुलाम हैदरकडे परत येईल.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट