शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दलित भाजपा खासदार पक्षनेतृत्वावर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:13 IST

बंडाचा झेंडा हाती घेण्याची शक्यता; हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानात बंडखोरी वाढली

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : लोकसभेच्या उत्तर प्रदेशातील भाजपाच्या सदस्य सावित्रीबाई फुले यांनी पक्षत्याग केल्यानंतर भाजपाचे आणखी काही लोकसभा सदस्य बंडाचा झेंडा हाती घेण्याच्या विचारात आहेत. भाजपाच्या कट्टर समर्थक समजणाऱ्या व पहिल्यांदाच लोकसभेत निवडून गेलेल्या फुले यांनी केलेल्या पक्षत्यागापासून प्रेरणा मिळालेले हे खासदार पक्षाविरुद्ध आपली नाराजी व्यक्त करीत आहेत.खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि कीर्ती आझाद यांची प्रसिद्धी तर बंडखोर अशीच आहे. त्यांना आता हरियाणातील धर्मवीर येऊन मिळाले आहेत. उत्तर प्रदेशातील किमान पाच दलित खासदारांनी आमच्या समाजाला अशाच पद्धतीने दडपले जाणार असेल तर आम्ही पक्षात राहणार नाही, असे पक्ष श्रेष्ठींना सांगितले आहे. दिल्लीतील दलित खासदाराने पक्षाच्या व्यासपीठावर नुकतीच मला पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही अशा शब्दांत आपली काळजी आधीच बोलून दाखवली आहे. हरियाणातून केंद्रात मंत्री असलेल्याने स्वत:चा पक्ष सुरू करण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.खासदार ‘बोलायला’ सुरुवात करतीलमध्यप्रदेशातील भाजपाचे खासदार या सगळ्यात सक्रिय असून त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, पक्षात नाराजी तीव्रतेने वाढत आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीही येवो अनेक खासदार ‘बोलायला’ सुरुवात करतील व ते आता पक्ष श्रेष्ठींचे आज्ञाधारक राहणार नाहीत.या खासदारांपैकी काही जणांना मे २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळणार नाही याची कल्पना आहे. त्याचे कारण म्हणजे विद्यमान खासदारांपैकी ५० टक्क्यांना पुन्हा संधी नाही, असे पक्ष श्रेष्ठींनी संकेत दिले आहेत.असे असले तरी ७५ वर्षांच्या वयोमर्यादेचा निकष फार कठोरपणे लावला जाणार नाही. परंतु, किमान १५ वृद्ध खासदारांना पक्ष विश्रांती देणार आहे. ११ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असून प्रमुख तीन हिंदी भाषिक राज्ये भाजपाने गमावली तर ही बंडखोरी वाढणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपा