कोरोनाच्या महामारीत आणखी एक संकट, 5 वर्षात कॅन्सरचे 12 टक्के रुग्ण वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 09:56 AM2020-08-19T09:56:35+5:302020-08-19T09:57:04+5:30

आयसीएमआरच्या माहितीनुसार, राष्ट्रीय कॅन्सर रजिस्ट्री कार्यक्रम रिपोर्टमध्ये यासंदर्भात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवाातील हा अंदाज 28 लोकसंख्या आधारित कॅन्सर रजिस्ट्रीतून मिळालेल्या माहितीवर आधारीत आहे.

Another crisis in the corona epidemic, the cancer patients will grow by 12 percent in 5 years | कोरोनाच्या महामारीत आणखी एक संकट, 5 वर्षात कॅन्सरचे 12 टक्के रुग्ण वाढणार 

कोरोनाच्या महामारीत आणखी एक संकट, 5 वर्षात कॅन्सरचे 12 टक्के रुग्ण वाढणार 

googlenewsNext
ठळक मुद्देआयसीएमआरच्या माहितीनुसार, राष्ट्रीय कॅन्सर रजिस्ट्री कार्यक्रम रिपोर्टमध्ये यासंदर्भात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवाातील हा अंदाज 28 लोकसंख्या आधारित कॅन्सर रजिस्ट्रीतून मिळालेल्या माहितीवर आधारीत आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एक संकट देशावर येणार असल्याचा समजते. कोरोना महामारीने देशातील हजारो नागरिकांचा जीव घेतला असतानाच कॅन्सरचा रोगही पुन्हा परततोय. कारण, भारतात पुढील 5 वर्षात कॅन्सर रुग्णांच्या संख्येत 12 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येते. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद आणि राष्ट्रीय रोग समाजशास्त्र व अनुसंधान केंद्राने यासंदर्भात माहिती दिली आहे. यावर्षा देशात कॅन्सर रुग्णांची संख्या 13.9 लाखांपर्यंत पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

आयसीएमआरच्या माहितीनुसार, राष्ट्रीय कॅन्सर रजिस्ट्री कार्यक्रम रिपोर्टमध्ये यासंदर्भात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवाातील हा अंदाज 28 लोकसंख्या आधारित कॅन्सर रजिस्ट्रीतून मिळालेल्या माहितीवर आधारीत आहे. त्यानुसार, 2025 पर्यंत देशातील कॅन्सर रुग्णांची संख्या 15.7 लाखापर्यंत पोहोचणार आहे. 

या अहवालानुसार, तंबाखूजन्य कॅन्सरग्रस्तांची संख्या 3.7 लाख असण्याचा अंदाज आहे. 2020 मधील एकूण कॅन्सर रुग्णसंख्येच्या तुलनेत हे 27.1 टक्के आहे. देशाच्या पूर्वोत्तर भागात सर्वाधिक कॅन्सर रुग्णांचा प्रभाव असल्याचे दिसून येईल. महिलांच्या स्तन कॅन्सरमध्ये 2 लाख (14.8%), गर्भाशय कॅन्सरमध्ये 0.75 लाख (5.4 टक्के), महिला व पुरुषांमध्ये आतड्यांच्या कॅन्सरचे 2.7 लाख प्रकरणं (19.7 टक्के) असण्याचा अंदाज आहे. तसेच, पुरुषांमध्ये फेफडे, तोंड, पोट आणि अन्नप्रणालीचा कॅन्सर सर्वसामान्य असतो. तर, दुसरीकडे महिलांच्या स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सरही साधारण असतो. 
 

Web Title: Another crisis in the corona epidemic, the cancer patients will grow by 12 percent in 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.