पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:13 IST2025-05-09T12:10:46+5:302025-05-09T12:13:06+5:30
जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये एका मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला होता, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला आहे.

पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या खूप तणाव आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीत आहे. पाकिस्तानकडून सतत अयशस्वी हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ८ आणि ९ मे २०२५च्या मध्यतरी रात्री,जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये एका मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला होता, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला आहे. बीएसएफने केलेल्या या कारवाईत ७ दहशतवादी मारले गेले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मारले गेलेले दहशतवादी जैशचे असल्याचे म्हटले जात आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या दरम्यान, मध्यरात्री दहशतवाद्यांनी जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला. लष्कराने या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये दहशतवादी घुसखोरी आणि गोळीबार करताना दिसत आहेत.
#WATCH | On 8-9 May 2025, BSF foiled a major infiltration bid at the International Boundary in Samba district, J&K by killing at least seven terrorists and causing extensive damage to the Pakistan Post Dhandhar, says BSF.
— ANI (@ANI) May 9, 2025
(Source: BSF) pic.twitter.com/c2MWOUuvQs
दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान!
रात्रीच्या वेळी लष्कराची तुकडी सीमेवर गस्त घालत होती. यावेळी त्यांची नजर दहशतवाद्यांवर पडली. रात्री ११.३०च्या सुमारास दहशतवाद्यांनी आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सैनिकांनी अडवल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सैनिकांनी गोळीबार सुरू केला. घुसखोरीच्या बाबतीत सांबा हे आधीच अतिशय संवेदनशील क्षेत्र आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर येथे दक्षता वाढवण्यामागे हेच कारण आहे.