ठळक मुद्देआमदार मिहिर गोस्वामी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केलाभाजपाचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी दिल्लीमध्ये भाजपाचे सदस्यत्व स्वीकारलेमिहीर गोस्वामी यांनी काही दिवस आधीच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची इच्छा व्यक्त केली होती
नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासाठी आजचा दिवस हा दुहेरी धक्का देणारा ठरला. आज दुपारी नाराज असलेले मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असतानाच संध्याकाळी आमदार मिहिर गोस्वामी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी दिल्लीमध्ये भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले.
टीएमसीचे नेते असलेले मिहीर गोस्वामी यांनी काही दिवस आधीच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पश्चिम बंगालमधील कुचबिहार विधानसभा मतदारसंघातील टीएमसीचे खासदार असलेले मिहीर गोस्वामी हे शुक्रवारी भाजपा खासदार निशित प्रामाणिक यांच्यासोबत नवी दिल्लीसाठी रवाना झाले होते. तेव्हापासूनच ते भाजपामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या राजकारणातील मोठे नाव असलेले शुभेंदू अधिकारी हे
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. काही दिवसांपूर्वीपासून ते भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आज त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, शुभेंदू अधिकारी यांनी गुरुवारी हुगळी रिव्हर ब्रिज कमिशनमधून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता आपल्या मंत्रिपदाचाही राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामापत्रात शुभेंदू अधिकारी म्हणाले की, मी माझ्याकडील मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मी राज्यपालांनाही याबाबतची माहिती दिली आहे. तुम्ही मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे.
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Another blow to Mamata Banerjee during the day, MLA Mihir Goswami joins BJP
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.