स्वाईन फ्लूचे आणखी ४० बळी

By Admin | Updated: March 5, 2015 01:10 IST2015-03-05T01:10:53+5:302015-03-05T01:10:53+5:30

स्वाईन फ्लूची लागण झालेल्या आणखी ४० रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाल्यामुळे दोन महिन्यात या रोगाने दगावलेल्यांची संख्या वाढून ११९८ वर पोहोचली आहे.

Another 40 victims of swine flu | स्वाईन फ्लूचे आणखी ४० बळी

स्वाईन फ्लूचे आणखी ४० बळी

नवी दिल्ली : स्वाईन फ्लूची लागण झालेल्या आणखी ४० रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाल्यामुळे दोन महिन्यात या रोगाने दगावलेल्यांची संख्या वाढून ११९८ वर पोहोचली आहे. शिवाय स्वाईन फ्लूची लागण झालेल्यांचा आकडाही २२ हजारांवर पोहोचल्याचे वृत्त आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विविध राज्यांमध्ये ११९८ लोकांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला तर एच१एन१ विषाणूची लागण झालेले २२२४० रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
च्स्वाईन फ्लूने राजस्थानमध्ये सर्वाधिक २८६ बळी घेतले तर महाराष्ट्रात १७०, मध्य प्रदेशात १६८, तेलंगणमध्ये ५९, पंजाबात ४७, दिल्लीत १०, कर्नाटकात ५१, उत्तर प्रदेशत १६, हरियाणात २४, आंध्र प्रदेशात १४ आणि जम्मू-काश्मिरात १० जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Another 40 victims of swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.