बीएसएफच्या आणखी १५ जवानांना छत्तीसगढमध्ये झाला कोरोनाचा संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 03:40 IST2020-06-25T03:39:50+5:302020-06-25T03:40:01+5:30

या जिल्ह्यात आजवर कोरोनाचा संसर्ग झालेल्या बीएसएफ जवानांची संख्या २६ झाली आहे.

Another 15 BSF personnel contracted corona in Chhattisgarh | बीएसएफच्या आणखी १५ जवानांना छत्तीसगढमध्ये झाला कोरोनाचा संसर्ग

बीएसएफच्या आणखी १५ जवानांना छत्तीसगढमध्ये झाला कोरोनाचा संसर्ग

रायपूर : छत्तीसगढमधील कांकेर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आणखी १५ जवानांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात आजवर कोरोनाचा संसर्ग झालेल्या बीएसएफ जवानांची संख्या २६ झाली आहे. या संदर्भात कांकेर जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी
डॉ़ जगजीवनराम उइके यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग झालेल्या आणखी १५ जवानांपैकी १४ जणांचा चाचणी अहवाल मंगळवारी रात्री व आणखी एका जवानाचा चाचणी अहवाल मंगळवारी संध्याकाळी हाती आला. या पंधरा जवानांपैकी १० जणांना बंडे गावातील तर इतर पाच जवानांना अनंतगढ गावातील क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच जगदालपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Another 15 BSF personnel contracted corona in Chhattisgarh