पेन्शनर संघटनेच्या वार्षिक सभेची सांगता
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30
बारामती : बारामती तालुका पेन्शनर्स आसोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २१) पार पडली. या वेळी दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पेन्शनर संघटनेच्या वार्षिक सभेची सांगता
ब रामती : बारामती तालुका पेन्शनर्स आसोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २१) पार पडली. या वेळी दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी पेन्शन तज्ज्ञ बाजीराव जाधव यांनी सातवा वेतन आयोग निवडश्रेणी त्रिस्तरीय वेतनश्रेणी याबद्दल उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. या वेळी राष्ट्रपती पदकविजेते माजी पोलीस अधिकारी अनिल जाधव, पेन्शनर्स राज्य पुरस्कारविजेत्या आशाबी बागवान, दाक्षायणी घोंगडे, शोभा गाठे यांचा आसोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. पंचायत समितीचे सभापती करण खलाटे यांच्या हस्ते दुसर्या सत्राचे उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी पंचायत समिती पातळीवर पेन्शनर व्यक्तींच्या समस्या सोडवण्यास प्रधान्य देणार असल्याचे सांगितले. या वेळी गटशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे, आर. टी. गायकवाड उपस्थित होते. आर. जी. महानिभव यांनी आभार मानले.