शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

संचारबंदीच्या घोषणेने अहमदाबादमध्ये गोंधळ, शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे

By बाळकृष्ण परब | Published: November 20, 2020 10:56 AM

corona virus in ahmedabad : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद प्रशासनाने आज रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत संचारबंदीची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देअहमदाबादमध्ये ५७ तासांच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहेया घोषणेनंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहेकाही ठिकाणी लोकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली आहे

अहमदाबाद - राजधानी दिल्लीपाठोपाठ गुजरामधील अहमदाबादमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये ५७ तासांच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या घोषणेनंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी लोकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली आहे. अहमदाबाद प्रशासनाने आज रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत संचारबंदीची घोषणा केली आहे. यादरम्यान, केवळ मेडिकल आणि दुधाची दुकानेच सुरू राहणार आहेत.गुजरामधील आयएसएस अधिकारी डॉ. राजीव कुमार गुप्ता यांनी ट्विट करून सांगितले की, रात्री उशिरा कोरोनाच्या स्थितीची समीक्षा करण्यात आली. त्यानंतर आज रात्री ९ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ६.०० वाजेपर्यंत अहमदाबाद शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधील केवळ दूध आणि औषध विक्री करणारी दुकानेच सुरू ठेवण्यास परवानगी असेल.तसेच अहमदाबादमधील शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडण्याचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये लागू झालेली संचारबंदी आणि वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने संपूर्ण राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. अहमदाबादमधील या संचारबंदीदरम्यान, केवळ आवश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू राहतील. याशिवाय विजय रुपानी सरकारने अहमदाबादसाठी ३०० डॉक्टर, ३०० वैद्यकीय विद्यार्थी आणि २० अतिरिक्त अ‍ॅम्ब्युलन्स तैनात केल्या आहेत. दिल्लीसोबतच उत्तर प्रदेश आणि अहमदाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याahmedabadअहमदाबादIndiaभारत