(निनाद) धालेवाडीत हरिनाम सप्ताह

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:13+5:302015-09-01T21:38:13+5:30

जेजुरी : धालेवाडी (पुरंदर ) येथे गोकुळ अष्टमीनिमित्त श्रीकृष्ण जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह; तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे. पहिल्या दिवशी ह.भ.प. प्रवीणमहाराज लोळे यांनी पहिले पुष्प गुंफले. या कीर्तनात महिलांनीही सहभाग घेतला होता. या अखंड हरिनाम सप्ताहमध्ये विष्णुपंतमहाराज भाडळे, राऊतमहाराज, अलकाताई वाल्हेकर, मनोजमहाराज साळुंखे, दशरथमहाराज मानकर आदींची कीर्तने होणार आहेत. दि. ६ रोजी बाळकृष्णमहाराज गोगावले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्याच बरोबर तानाजी महाराज पोमण, डॉ. संजय गळवे, स्नेहाताई भोसले, पोपटमहाराज भोसले, कोमल शेंडकर, बाळासाहेब काळे, दशरथमहाराज कादबाने यांची प्रवचने होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन रामदास अण्णा काळाणे, माजी आदर्श सरपंच तथा उपसरपंच संभाजी काळाणे तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी ध

(Annad) Harnam Week in Dhalewadi | (निनाद) धालेवाडीत हरिनाम सप्ताह

(निनाद) धालेवाडीत हरिनाम सप्ताह

जुरी : धालेवाडी (पुरंदर ) येथे गोकुळ अष्टमीनिमित्त श्रीकृष्ण जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह; तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे. पहिल्या दिवशी ह.भ.प. प्रवीणमहाराज लोळे यांनी पहिले पुष्प गुंफले. या कीर्तनात महिलांनीही सहभाग घेतला होता. या अखंड हरिनाम सप्ताहमध्ये विष्णुपंतमहाराज भाडळे, राऊतमहाराज, अलकाताई वाल्हेकर, मनोजमहाराज साळुंखे, दशरथमहाराज मानकर आदींची कीर्तने होणार आहेत. दि. ६ रोजी बाळकृष्णमहाराज गोगावले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्याच बरोबर तानाजी महाराज पोमण, डॉ. संजय गळवे, स्नेहाताई भोसले, पोपटमहाराज भोसले, कोमल शेंडकर, बाळासाहेब काळे, दशरथमहाराज कादबाने यांची प्रवचने होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन रामदास अण्णा काळाणे, माजी आदर्श सरपंच तथा उपसरपंच संभाजी काळाणे तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी धालेवाडी, सर्व महिला बचत गट धालेवाडी आदींनी केले आहे.

Web Title: (Annad) Harnam Week in Dhalewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.