(निनाद) जेजुरीत ६ गावे संवेदनशील
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:36+5:302015-08-03T22:26:36+5:30
पोलीस यंत्रणा सज्ज : आज मतदान

(निनाद) जेजुरीत ६ गावे संवेदनशील
म ंबई : महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांकरिता विश्वविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांना ब्रॅण्ड ॲम्बेसडर होण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र याकरिता आपण कुणालाही मानधन देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसंबंधी माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी बिबट्या सफारी सुरू करण्यात येणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.ठाणे खाडीमध्ये फ्लेमिंगो अभयारण्यासाठी १६ चौरस कि.मी. जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्याचा विस्तार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी).......................मंत्र्यांची अनुपस्थिती सनसनाटीकरितामंत्रिमंडळाच्या बैठकांना मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबतची चर्चा ही केवळ सनसनाटी निर्माण करण्याकरिता केलेली आहे. आपण स्वत: पाचवेळा मंत्रिमंडळ बैठकांना अनुपस्थित होते. वैयक्तिक कारणास्तव उपस्थित राहणे अशक्य असल्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन अनुपस्थित राहावे लागते.