अण्णा हजारे यांच्या हस्ते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे आनावरण

By Admin | Updated: November 2, 2015 00:17 IST2015-11-02T00:04:59+5:302015-11-02T00:17:24+5:30

लातूर : जागृती शुगर ॲन्ड आलईड इडस्ट्रीच्या वतीने कारखाना स्थळावर उभारण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे आनावारण व पाचव्या गळीत हंगामाचा शुभांरभ गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते होणार आहे़

Anna Hazare hands over the statue of Vilasrao Deshmukh | अण्णा हजारे यांच्या हस्ते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे आनावरण

अण्णा हजारे यांच्या हस्ते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे आनावरण

लातूर : जागृती शुगर ॲन्ड आलईड इडस्ट्रीच्या वतीने कारखाना स्थळावर उभारण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे आनावारण व पाचव्या गळीत हंगामाचा शुभांरभ गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते होणार आहे़
अध्यक्ष स्थानी कृष्णा सहकारी साखरकारखाना कराडचे चेअरमन डॉ़ सुरेशबाबा जयवंतराव भोसले हे राहणार आहेत़ तर प्रमुख पाहुणे म्हणून विलासराव देशमुख सेंटर मुंबईचे अध्यक्ष उल्हासदादा पवार, माजी मंत्री आ़दिलीपराव देशमुख, आ़ अमित देशमुख,विकास कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष अतुलबाबा भोसले, खा़ सुनिल गायकवाड, आ़ बस्वराज पाटील, माजीख़ा़ रुपाताई पाटील, आ़ विनायकराव पाटील, आ़ विक्रम काळे, आ़ सतीष चव्हाण, विनायकराव पाटील कवठेकर, आ़ सुधाकर भालेराव, आ़ त्र्यंबक भिसे, त्र्यंबकदास झंवर आदींची उपस्थिती राहाणार आहे़ या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा गौरवी अतुल भोसले, उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, संचालक दिलीप माने, सुर्यकांत करवा, गणपतराव मोरगे, प्रकल्प व्यवस्थापक अनिलकुमार देशमुख यांनी केले आहे़

Web Title: Anna Hazare hands over the statue of Vilasrao Deshmukh