रेल्वेच्या नाराज अभियंत्याचा वरिष्ठाच्या पत्नीवर हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 02:24 IST2020-06-24T02:24:28+5:302020-06-24T02:24:36+5:30

तो रेल्वेच्या मालगाडीच्या डब्यांची देखभाल व दुरुस्ती करणा-या कार्यशाळेत कामाला होता. त्याने कोटा येथील रेल्वे वर्कशॉप कॉलनीत उपमुख्य तांत्रिक अभियंता प्रमोदकुमार सिंग याच्या पत्नीवर हल्ला केला. ही घटना सोमवारी घडली.

Angry railway engineer attacks senior wife | रेल्वेच्या नाराज अभियंत्याचा वरिष्ठाच्या पत्नीवर हल्ला!

रेल्वेच्या नाराज अभियंत्याचा वरिष्ठाच्या पत्नीवर हल्ला!

कोटा : दोन वर्षांपूर्वी बजावण्यात आलेल्या खात्यांतर्गत नोटिसीमुळे नाराज असलेल्या रेल्वेच्या एका अभियंत्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ४५ वर्षीय पत्नीवर घरात घुसून हल्ला केल्याची घटना येथे घडली. पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, शिवप्रकाश मीणा (४५) असे हल्लेखोर अभियंत्याचे नाव आहे. तो रेल्वेच्या मालगाडीच्या डब्यांची देखभाल व दुरुस्ती करणा-या कार्यशाळेत कामाला होता. त्याने कोटा येथील रेल्वे वर्कशॉप कॉलनीत उपमुख्य तांत्रिक अभियंता प्रमोदकुमार सिंग याच्या पत्नीवर हल्ला केला. ही घटना सोमवारी घडली.
कोटा येथील मुख्य कार्यशाळा व्यवस्थापकांनी (सीडब्ल्यूएम) सांगितले की, आरोपी अभियंत्यास सोमवारी सायंकाळीच निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी मात्र त्याला अद्याप अटक केलेली नाही.
रेल्वे कॉलनी पोलीस ठाण्याचे प्रभारी हंसराज मीणा यांनी सांगितले की, आरोपीच्या विरोधात भादंवि ३४१, ३२३ आणि ३५४ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
>सहकाऱ्यांशी गैरवर्तणूक
दोन वर्षांपूर्वी दोन वेगवेगळ्या घटनांत आपल्या सहकाºयांसोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप शिवप्रकाश मीणा याच्याविरुद्ध आहे.
याप्रकरणी प्रमोदकुमार सिंग यांनी त्यास सहा महिन्यांपूर्वी नोटीस बजावली होती. यावरून मीणा हा सिंग यांच्यावर नाराज होता. सोमवारी दुपारी तो सिंग यांच्या घरात घुसला. तेथे त्याने त्यांच्या पत्नीस धक्का देऊन खाली पाडले.

Web Title: Angry railway engineer attacks senior wife