राष्ट्रपतींवर अँजिओप्लास्टी
By Admin | Updated: December 14, 2014 10:53 IST2014-12-14T02:24:25+5:302014-12-14T10:53:23+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर शनिवारी सायंकाळी अँजिओप्लास्टी करण्यात आली.

राष्ट्रपतींवर अँजिओप्लास्टी
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर शनिवारी सायंकाळी अँजिओप्लास्टी करण्यात आली. पोटात दुखत असल्याने 79 वर्षीय मुखर्जी यांना सकाळी येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यात त्यांच्या एका धमनीत ब्लॉकेज आढळून आल्याने डॉक्टरांनी राष्ट्रपतींवर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला व स्टेन्ट टाकून धमनीतील अडथळा दूर करण्यात आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)