शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशात परिवहन मंत्र्यांच्या घराची जाळपोळ; नव्या जिल्ह्याच्या नावावरून उसळला हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 21:33 IST

Andhra Minister's House Set On Fire : लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आंध्र प्रदेशात नव्याने तयार करण्यात आलेल्या कोनासीमा (Konaseema) जिल्ह्याचे नाव बदलून बीआर आंबेडकर कोनासीमा (BR Ambedkar Konaseema) जिल्हा असे करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात मंगळवारी जिल्हा मुख्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर येथील अमलापुरम शहरात हिंसाचार उसळला. या हिंसाचारात परिवहन मंत्री पिनिपे विश्वरुपू (Pinipe Viswarupu) यांचे घर जाळण्यात आले. मात्र, पोलिसांनी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले.

लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात पोलिसांची गाडी आणि शैक्षणिक संस्थेची बसही जाळण्यात आली. काही राजकीय पक्ष आणि समाजकंटकांनी जाळपोळ केल्याचा आरोप राज्याच्या गृहमंत्री तानेती वनिता (Taneti Vanitha) यांनी केला आहे. "या घटनेत जवळपास 20 पोलीस कर्मचारी जखमी होणे दुर्दैवी आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करून दोषींना न्याय देऊ", असे तानेती वनिता यांनी म्हटले आहे. 

4 एप्रिलला  कोनसीमा जिल्ह्याची निर्मिती 4 एप्रिल रोजी पूर्व गोदावरी जिल्ह्यापासून वेगळे करून कोनसीमा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. गेल्या आठवड्यात, राज्य सरकारने कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलून बीआर आंबेडकर कोनसीमा जिल्हा करण्यासाठी प्राथमिक अधिसूचना जारी करून लोकांकडून हरकती मागवल्या होत्या. यानंतर कोनसीमा साधना समितीने  (Konaseema Sadhana Samiti)  नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आक्षेप घेत जिल्ह्याचे नाव कोनसीमा असेच ठेवण्याची मागणी केली.

जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात जिल्हा दंडाधिकारी हिमांशू शुक्ला यांना निवेदन देण्याचा प्रयत्न सुरू असताना कोनसीमा साधना समितीने मंगळवारी आंदोनल केले. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आंदोलक संतप्त झाले आणि अखेर अमलापुरममध्ये (Amalapuram) जाळपोळ झाल्याची घटना घडली.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशfireआग