शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मजुरांसाठी आंध्र सरकारच पॅकेज, जगनमोहन यांचं विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 05:42 IST

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अडकून पडल्याने सध्या शिबिरात राहात असलेल्या प्रत्येक स्थलांतरित मजुरात ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपल्यावर घरी परत जाताना रोख दोन हजार रुपये देण्याचा विचार मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मांडला आहे

हैदराबाद : अन्य राज्यांतून आलेल्या स्थलांतरित मजुरांनी धोका पत्करून घरी परत जाण्याचा आटापिटा न करता ‘लॉकडाऊन’ संपेपर्यंत त्यांना सध्या ज्या शिबिरांमध्ये ठेवले आहे तेथेच राहण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे यासाठी आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्याशी एक आकर्षक ‘पॅकेज’ देऊ केले आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अडकून पडल्याने सध्या शिबिरात राहात असलेल्या प्रत्येक स्थलांतरित मजुरात ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपल्यावर घरी परत जाताना रोख दोन हजार रुपये देण्याचा विचार मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मांडला आहे. हे पैसे त्यांना सुरक्षित वाहनाने घरी परत जायला व तेथे गेल्यानंतर पुढे काही दिवस जेवणाखाण्यासाठी उपयोगी पडतील, असा सरकारचा विचार आहे. आता या स्थलांतरितांना डाळ किंवा सांबार भाताखेरीज दूध, अंडे, फळे, सुकामेवा, संत्रावर्गीय फळ व केळेही देण्यात येत आहे. असा प्रत्येक स्थलांतरित मजुरावर राज्य सरकार जेवण, निवास व्यवस्था, प्रवास व स्वच्छतागृहे यासाठी दिवसाला प्रत्येकी ८५० रुपये खर्च करीत आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. (वृत्तसंस्था)उद्धव ठाकरे यांना ममता बॅनर्जींचा फोनच्कोलकाता : महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आदी राज्यांत लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या बंगाली मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांना स्थानिक यंत्रणा व लोकांशी समन्वय साधून पश्चिम बंगाल सरकारतर्फे आर्थिक मदत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी जाहीर केले.च्महाराष्ट्र सरकार स्थलांतरित मजुरांच्या देखभालीसाठी योग्य प्रकारे काम करत असल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून त्यांचे आभार मानले.च्मुंबईत अडकून पडलेले हजारो स्थलांतरित मजूर वांद्रे रेल्वे टर्मिनसच्या बाहेर बुधवारी जमा झाले. आम्हाला गावी परतायचे असून त्यासाठी विशेष ट्रेन चालवाव्यात अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. या मागणीचे राजकीय भांडवल करण्याचा काही जणांकडून प्रयत्न होत असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली. महाराष्ट्र सरकार स्थलांतरित मजुरांसाठी करत असलेल्या कार्यात पश्चिम बंगाल सरकार सहकार्य करण्यास तयार आहे असे ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनीवरून सांगितले.च् मुंबईप्रमाणेच गुजरातमधील सूरत येथेही अडकून पडलेले स्थलांतरित मजूर आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. या आठवड्यात दुसऱ्यांदा असा प्रकार तिथे घडला आहे.प. बंगालमध्ये अडकले दोन लाख मजूरच्देशातील १८ राज्यांमध्ये हजारो बंगाली मजूर अडकून पडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये अन्य राज्यातून आलेले २ लाख स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. त्या सर्वांच्या राहाण्याची व जेवणाची सोय राज्य सरकारने ७११ निवारा छावण्यांत केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरणhyderabad-pcहैदराबादAndhra Pradeshआंध्र प्रदेश