शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

PUBG खेळता खेळता 'सब्जी'वाल्यावर जडलं प्रेम, भेटीसाठी 2500KM केला प्रवास!; पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 13:02 IST

प्रेम आंधळं असतं, ते एकदा एखाद्या व्यक्तीवर जडलं की प्रेमासाठी व्यक्ती जगातील कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यास एका पायावर तयार होतो असं म्हणतात.

प्रेम आंधळं असतं, ते एकदा एखाद्या व्यक्तीवर जडलं की प्रेमासाठी व्यक्ती जगातील कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यास एका पायावर तयार होतो असं म्हणतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील बरेली येथून समोर आला आहे. बरेलीतील फरीदपूर येथील एका तरुणाचे PUBG खेळताना अंदमान-निकोबारमधील दहावीच्या विद्यार्थिनीवर प्रेम जडलं आणि त्यानंतर दोघांचं फेसबुकवर बोलणं सुरू झालं. प्रकरण इतकं पुढे गेलं की विद्यार्थिनी अंदमान निकोबारहून फरिदपूरला आपल्या प्रियकराला भेटायला आली. मुलीच्या नातेवाईकांना विद्यार्थिनी न सापडल्यानं त्यांनी अंदमान निकोबारमध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या तपासात तरुणीचे लोकेशन बरेलीमध्ये आढळून आले.

अंदमान निकोबार पोलिसांनी बरेली येथे येऊन मुलीला ताब्यात घेतले आणि तिची वैद्यकीय तपासणी केली. बरेलीतील फरीदपूर पोलीस ठाण्यात राहणारा राजपाल भाजीविक्रेता आहे. त्याला मोबाईलवर PUBG खेळण्याचाही जणू व्यसनच जडलं होतं. एके दिवशी PUBG खेळत असताना, तो अंदमान आणि निकोबारमधील दहावीच्या विद्यार्थीनीच्या संपर्कात आला. ओळख वाढली आणि दोघं फेसबुकच्या माध्यमातून चॅट करू लागले.

प्रियकराला भेटण्यासाठी प्रेयसी अंदमानहून फरीदपूरला पोहोचलीकाही वेळ बोलल्यानंतर विद्यार्थिनीने प्रियकराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर २२ जानेवारीला तरुणी राजपालला भेटण्यासाठी अंदमान-निकोबारहून कोलकातामार्गे फरीदपूरला पोहोचली. विद्यार्थिनी घरी न परतल्यामुळे तिच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या मोबाईलचे लोकेशन तपासले तेव्हा ते लोकेशन बरेलीचे आढळले. त्यानंतर अंदमान निकोबार पोलिसांनी बरेली गाठून विद्यार्थिनीला ताब्यात घेतले, मात्र तिचा प्रियकर राजपाल घटनास्थळावरुन पळून गेला. पोलिसांनी विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करून तिला अंदमान निकोबारला परत नेले.

प्रियकराला लग्न करायचे असेल तर दोन वर्षे अंदमानमध्ये राहावं लागणारमुलगी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी असून अद्याप ती अल्पवयीन आहे. अंदमान पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलीचे कुटुंब त्या दोघांचं लग्न करुन देण्यास तयार आहे, परंतु त्या तरुणाला त्यांच्यासोबत अंदमान निकोबारमध्ये दोन वर्षे राहावं लागेल अशी अट कुटुंबीयांनी घातली आहे. मुलगी प्रौढ झाल्यावर तिचे लग्न केले जाईल. सध्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचा तिच्या प्रियकरावर विश्वास नाही, तो २ वर्ष तिच्यासोबत राहिल्यानंतरच त्यांचं लग्न करुन देऊ असं पालकांनी म्हटलं आहे.

टॅग्स :PUBG Gameपबजी गेम