Amit Shah on Veer Savarkar Andaman: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अंदमान आणि निकोबार बेटांमधील श्री विजयपुरम येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या "सागरा प्राण तळमळला" या गाण्याच्या ११५ व्या वर्धापन दिनानिमित्त आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दक्षिण अंदमानातील श्री विजयपुरम येथे वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, "अंदमान आणि निकोबार ही केवळ बेटांची भूमी नाही, तर ती असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, समर्पण आणि देशभक्तीने निर्माण केलेली 'तपोभूमी' आहे. आपण सर्वजण एका पवित्र भूमीवर एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्यापूर्वी कोणीही स्वेच्छेने येथे आले नव्हते. ज्यांना येथे आणले गेले जात असे, त्यांची परतण्याची आशा नसायची. त्यांचे कुटुंबीयही त्यांना विसरुन जायचे. त्या काळात, 'काळ्या पाण्या'ची शिक्षा भोगल्यानंतर कोणीही परत येऊ शकेल अशी कल्पना कोणीही केली नव्हती. पण सावरकरांनी ती धमक दाखवली. ते धाडस त्यांच्यात होते. केवळ भयावर विजय मिळवणारा शूर नसतो, तर भय ओळखून त्यावर विजय मिळवणारा खरा शूरवीर असतो. वीर सावरकर यांचे जीवन असेच होते. त्यांना सलाम."
ते पुढे म्हणाले, "जे लोक परत यायचे ते त्यांचे शरीर, मन आणि आत्मा इतके कमकुवत होत असत. ते लोक कधीही पूर्णपणे बरे होऊ शकले नाहीत. पण आज वीर सावरकरांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण वर्षे येथे घालवली असल्याने हे ठिकाण सर्व भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे. येथे अनेक लोकांनी आपले प्राण अर्पण केले. मी सेल्युलर जेलच्या नोंदींचा सखोल अभ्यास केला आहे, फक्त दोनच प्रांत आहेत ज्यांच्या स्वातंत्र्यसैनिकांना येथे फाशी देण्यात आली नाही. त्यामुळे सावरकरांचा अभिमान बाळगलाच पाहिजे.'
Web Summary : Amit Shah and Mohan Bhagwat unveiled Veer Savarkar's statue in Andaman. Shah lauded Andaman as a 'Tapobhoomi' of freedom fighters' sacrifice. He emphasized Savarkar's courage in enduring the 'Kala Pani' punishment, making the place a pilgrimage for Indians.
Web Summary : अमित शाह और मोहन भागवत ने अंडमान में वीर सावरकर की प्रतिमा का अनावरण किया। शाह ने अंडमान को स्वतंत्रता सेनानियों के बलिदान की 'तपोभूमि' बताया। उन्होंने 'काला पानी' की सजा सहने में सावरकर के साहस पर जोर दिया, जिससे यह स्थान भारतीयों के लिए तीर्थ बन गया।