....आणि पहिलवानाने खासदाराला लोळवलं

By Admin | Updated: March 23, 2017 20:10 IST2017-03-23T18:59:38+5:302017-03-23T20:10:58+5:30

कुस्तीच्या आखाड्यात दोन पहिलवानाची लढाई तुम्ही पाहिली असेल, पण बिहारमध्ये एका खासदाराने कुस्तीच्या आखाड्यात एका पहिलवानाविरोधात शड्डू ठोकले आणि दोघामध्ये दंगल झाली.

.... and the wrestler loses the MP | ....आणि पहिलवानाने खासदाराला लोळवलं

....आणि पहिलवानाने खासदाराला लोळवलं

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - कुस्तीच्या आखाड्यात दोन पहिलवानाची लढाई तुम्ही पाहिली असेल, पण बिहारमध्ये एका खासदाराने कुस्तीच्या आखाड्यात एका पहिलवानाविरोधात शड्डू ठोकले आणि दोघामध्ये दंगल झाली. पण पहिलवानाने त्या खासदाराला आखाड्यात लोळवलं आणि कुस्तीचा फड जिंकला. पहिलवानाने खासदाराला लोळवल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

बिहारच्या आरा येथिल कुंवर सिंह मैदानात कुस्तीचा फड रंगला होता. यावेळी राजदचे खासदार अरुण यादव यांना पहिलवानाला अवाहन देणं महागात पडले. कुस्तीच्या सर्वच प्रकारात त्यांचा पराभव झाला. सर्व जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या समोर झालेल्या पराभवानंतर त्यांचा राग अनावर झाला होता. त्यानंतर खासदार अरुण यादव आणि त्या पहिलवानात शाब्दिक चकमक झाली. तसेच त्या पहिलवानाशी त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. जमलेल्या लोकांनी दोघांना वेगळं करत हे प्रकरण सोडवलं पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूम ठोकत आहे.

 

Web Title: .... and the wrestler loses the MP