शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

...आणि दोन खाणकामगार रातोरात झाले करोडपती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 13:01 IST

खुदा देता है तो छप्पर फाड़ के, अशी म्हण आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात असलेल्या खाणीत काम करणाऱ्या दोन मजुरांच्या जीवनात ही म्हण प्रत्यक्षात उतरली आहे.

ठळक मुद्देखुदा देता है तो छप्पर फाड़ के, अशी म्हण आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात असलेल्या खाणीत काम करणाऱ्या दोन मजुरांच्या जीवनात ही म्हण प्रत्यक्षात उतरली आहे. खाणीत काम करत असताना त्यांच्या हाती एक मौल्यवान हिरा लागला. त्यामुळे ते रातोरात करोडपती झाले. हिऱ्याचा नुकताच लिलाव करण्यात आला. त्याचा मोबदला म्हणून या कामगारांना 2.55 कोटी रुपये मिळाले. लिलाव झालेला हिरा 42.9 कॅरेटचा असल्याचे सांगण्यात येत आहे

भोपाळ - खुदा देता है तो छप्पर फाड़ के, अशी म्हण आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात असलेल्या खाणीत काम करणाऱ्या दोन मजुरांच्या जीवनात ही म्हण प्रत्यक्षात उतरली आहे. खाणीत काम करत असताना त्यांच्या हाती एक मौल्यवान हिरा लागला. त्यामुळे ते रातोरात करोडपती झाले. त्याचे झाले असे की पन्ना येथील हिऱ्याच्या खाणीत काम करणाऱ्या मोतीलाल आणि रघुवीर या दोन मजुरांना दोन महिन्यांपूर्वी एक मोठा हिरा सापडला होता. त्या हिऱ्याचा नुकताच लिलाव करण्यात आला. त्याचा मोबदला म्हणून या कामगारांना 2.55 कोटी रुपये मिळाले. लिलाव झालेला हिरा 42.9 कॅरेटचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हिरा खरेदी करण्यासाठी अनेक कोट्यधीशांनी बोली लावली होती. आता हिरा विकून मिळालेल्या रकमेतून हे दोघेही आपल्या कर्जाची परतफेड करणार आहेत. तसेच मुलांना चांगले शिक्षण देणार आहेत. शुक्रवारी या हिऱ्याचा लिलाव करण्यात आला. त्यावेळी हा हिरा खरेदी करण्यासाठी अनेक जवाहीर तिथे पोहोचले होते. दरम्यान, सुमारे 2.55 कोटी रुपयांची बोली लावत झाशी येथील ज्वेलर राहुल जैन आणि बीएसपीचे नेते चरण सिंह यांनी हा हिरा खरेदी केला. लिलिलावावेळी त्यांनी 6 लाख रुपये प्रति कॅरेटच्या दराने बोली लावली होती.   याबाबत पन्ना येथील हिरा अधिकारी संतोष सिंह यांनी सांगितले की, मोतीलाल आणि रघुवीर प्रजापती यांना सापडलेल्या हिऱ्याचा लिलाव करण्यात आला असून, त्याबदल्यात त्यांना 2.55 कोटी रुपये देण्यात येतील. सध्या लावण्यात आलेल्या बोलीपैकी 20 टक्के रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम हिरा मिळाल्यानंतर जमा करण्यात येणार आहे.  दरम्यान, पन्ना येथील हिऱ्यांच्या खाणीमध्ये याआधीडी 42.9 कॅरेटचा हिरा सापडला होता. 1961 मध्ये पन्ना येथील हिऱ्यांच्या खाणीत 44.55 कॅरेटचा हिरा सापडला होता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMadhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत