..अन् अतिरेक्याला त्याचेच स्केच ओळखायला दिले
By Admin | Updated: September 19, 2014 01:31 IST2014-09-19T01:31:01+5:302014-09-19T01:31:01+5:30
पोलिसांच्या आजर्पयतच्या इतिहासातील अतिनिष्काळजीपणाचे सर्वात भयंकर उदाहरण ठरावे, अशी एक घटना समोर आली आह़े

..अन् अतिरेक्याला त्याचेच स्केच ओळखायला दिले
नवी दिल्ली : पोलिसांच्या आजर्पयतच्या इतिहासातील अतिनिष्काळजीपणाचे सर्वात भयंकर उदाहरण ठरावे, अशी एक घटना समोर आली आह़े पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एका संशयित अतिरेक्याला दोनदा पकडल़े त्याला त्याचेच रेखाचित्र (स्केच) दाखवले आणि ओळखायला सांगितल़े आपणच रेखाचित्रतील व्यक्ती आहोत, हे तोर्पयत अतिरेक्याच्या लक्षात आले होते; पण त्याने स्वत:ला ओळखण्यास नकार दिला आणि कळस म्हणजे एटीएसने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला सोडूनही दिल़े
हा अतिरेकी कुणी सामान्य अतिरेकी नव्हता, तर इंडियन मुजाहिदीनच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विंगचा म्होरक्या एजाज शेख होता़ पुणो एटीएसची ही चूक पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक मानली जात आह़े
पुणो एटीएसच्या हातून निसटल्यानंतर अखेर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने गत 5 सप्टेंबरला उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथून 27 वर्षाच्या शेखला अटक केली़ इंडियन मुजाहिदीनला सामग्री पुरवठा करणा:या काही प्रमुख सदस्यांपैकी शेख एक होता़ जामा मशीद, पुणो जर्मन बेकरी आणि वाराणसीतील शीतला घाटावरील बॉम्बस्फोटानंतर त्यानेच मीडियाला ई-मेल पाठविले होत़े पुणो एटीएसने शीतला घाट बॉम्बस्फोटांच्या काही आठवडय़ानंतर डिसेंबर 2क्1क् मध्ये शेखला पहिल्यांदा पकडले होत़े त्यानंतर दुस:यांदा फेब्रुवारी 2क्14 मध्येही तो पोलिसांच्या तावडीत सापडला; मात्र पहिल्यांदा केवळ कडक समज देऊन त्याला सोडण्यात आले होत़े दुस:यांदा शेखला अटक केल्यानंतर पुणो एटीएसने त्याला एक स्केच दाखवून अतिरेक्याची ओळख पटवायला सांगितल़े ते स्केच त्याचे स्वत:चेच होत़े मात्र त्याने स्केच ओळखण्यास नकार दिला आणि तो दुस:या वेळीही सुटला़