शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

...आणि तो पडला गटारात !

By admin | Published: July 17, 2017 7:42 PM

हरियाणातल्या फरिदाबादमधील सराय ख्वाजा मार्केटमधील एक सांडपाण्याचं गटार खुलं ठेवण्यात आलं आहे.

ऑनलाइन लोकमतफरिदाबाद, दि. 17 - गेल्या काही दिवसांपासून हरियाणामध्ये पावसानं जोरदार मुसंडी मारली आहे. पावसाच्या संततधारेमुळे हरियाणा पाऊसमय झालं आहे. मात्र या पावसामुळे कामावर जाणा-या कर्मचा-यांचेही प्रचंड हाल होत आहेत. दोन दिवसांपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे यमुनानगर, कुरुक्षेत्र आणि करनाल जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. ब-याच ठिकाणी व रस्त्यांवर पाणी साचल्यानं लोकांच्या हालाला पारावार राहिला नाहीये. त्यातच रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. हरियाणातल्या फरिदाबादमधील सराय ख्वाजा मार्केटमधील एक सांडपाण्याचं गटार खुलं ठेवण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे सराय ख्वाजा मार्केटमध्ये पाणी भरलं आहे. त्या साचलेल्या पाण्यात वाहन चालकांना गटाराचा अंदाज न आल्यामुळे अनेक जणांची त्या गटारात अडकतेय. एक बाइकस्वार त्या गटारात पडल्यानंतर त्याच्या पाठोपाठ एक रिक्षाही त्या गटारात फसली आहे. शहरातील ब-याच ठिकाणी पाणी तुंबण्याच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. मात्र हरियाणा सरकारकडून त्यासाठी कोणतीही ठोस अशी उपाययोजना करण्यात आली नाही.

 महाराष्ट्रासह मुंबई आणि पुण्यातही गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाण्याची डबकीच डबकी साचली आहेत. तर काही रस्त्यांवर खोदाईनंतर दुरुस्तीची कामे नीट न झाल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास आले. यामुळे महापालिकेच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. साचलेल्या पाण्याच्या या डबक्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली असून, आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात.

कॅम्प परिसरातील मोलेदिना रोडवर नवीन जिल्हा परिषदेच्या चौकात गेल्या तीन-चार वर्षांपासून छोट्याशा पावसानेही मोठे तळे साचते. यामुळे वाहनचालकांना प्रामुख्याने दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागते. याशिवाय लॉ कॉलेज रोड, प्रचंड वर्दळ असलेला सिंहगड रोड, कर्वे रस्ता, एमजी रोड, कर्नाटक हायस्कूलच्या समोर, अभिनव शाळेलगतचा चौक, राजाराम पुल आदी अनेक रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाण्याची लहान-मोठी डबकी साठलेली या पाहणीमध्ये निदर्शनास आली. तर अनेक रस्त्यांवर चेंबरची झाकणे पावसामुळे रस्त्यांपेक्षा खाली जाऊन मोठे खड्डे तयार झाले आहेत. या चेंबरच्या झाकणांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने गंभीर अपघात होऊ शकतो.

अनेक सोसायट्यांच्या समोरच पाणी साठल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तर पदपथाशेजारी पाणी साचल्याने वाहनांचे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याची दृश्ये शहराच्या विविध रस्त्यांवर दिसत आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर असलेली गटाराची झाकणे बऱ्याच ठिकाणी तुटलेल्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे अशाच ठिकाणी पाणी साचल्याने तुटलेले झाकण व खड्ड्यांचा अंदाज न आल्यास वाहनचालकांना आपला जीव धोक्यात घालावा लागेल. स्वारगेट येथे जेधे चौकात उड्डाण पुल बांधण्यात आला़ हा उड्डाण पुल सारसबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे संपतो, त्या ठिकाणचा रस्ता या वर्षीच करण्यात आला होता. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.

कोथरूडमधील अलंकार पोलीस चौकीजवळचा रस्त्याच्या अर्ध्याहून अधिक भागावर पाण्याचे डबके साचले आहेत़ एरंडवणा येथील कर्नाटक हायस्कूलकडून सिटीप्राईडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्वप्नशिल्प सोसायटीच्या बाहेर मोठे पाणी साचले आहे. यामुळे परिसरात डासांची पैदास होऊ लागली आहे़