अँकर पान १ नगरसेवकांना पाहिजे १५०% पगारवाढ

By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30

नगरसेवकांना पाहिजे १५०% पगारवाढ

Anchor Page 1 Corporators want 150% increase in salary | अँकर पान १ नगरसेवकांना पाहिजे १५०% पगारवाढ

अँकर पान १ नगरसेवकांना पाहिजे १५०% पगारवाढ

रसेवकांना पाहिजे १५०% पगारवाढ

सम आर मोअर इक्वल - कामगारांच्या आंदोलनामुळे प्रस्ताव तूर्त शीतपेटीत

पणजी : श्रीमंताने पिली की ते ड्रिंक्स अथवा तीर्थही ठरवले जाते. औषध म्हणूनही बोलबाला केला जातो. आणि गरिबाने पिली की ती दारू म्हटली जाते. त्याला दारुड्या ठरवले जाते. सम आर मोअर इक्वल... हाच अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावा लागतो. महापालिकेचे कामगार म्हणतात, वाढत्या महागाईच्या काळात आम्ही कसे जगायचे? त्यासाठी त्यांनी वेतनवाढ मागितली, तर त्यांना बडतर्फीची बक्षिसी मिळाली. सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच नगरसेवकांनी कामगारांच्या बडतर्फीच्या निर्णयाला पाठिंबा दिला. आणि आता याच बिचार्‍या विलक्षण गरीब नगरसेवकांना पगारवाढ पाहिजे. आहे की नाही अजब न्याय?
१०० टक्के वेतनवाढीसाठी महापालिका कामगारांनी पुकारलेला संप पालिकेने बडतर्फीचा बडगा वापरून मोडून काढला. आता नगरसेवकांनी आपल्या वेतनात १५० टक्के वाढीचा प्रस्ताव पुढे आणला आहे. आठ हजारांवरून २० हजार रुपये पगाराची मागणी त्यांनी केली आहे. पगारवाढ मागणारे केवळ महापालिकेचे कामगारच नाहीत तर नगरसेवकही आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कामगारांना १०० टक्के पगारवाढ हवी आहे तर नगरसेवकांना थेट १५० टक्के, हाच तेवढा फरक. कामगारांना बडतर्फ करून त्यांच्या मागण्या फेटाळल्या; परंतु नगरसेवकांच्या मागणीच्या बाबतीत निर्णय व्हायचा आहे.
सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, आठ हजारवरून वीस हजार रुपये पगार करण्याची मागणी यापूर्वीच काही नगरसेवकांनी केली होती. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा विषय चर्चेला येणार होता; परंतु कामगारांच्या पगाराचा विषय ऐरणीवर आल्यामुळे हा प्रस्ताव तूर्त शीतपेटीत ठेवला आहे. या प्रस्तावाच्या बाबतीत कमालीची गुप्तता बाळगली आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटाचे नगरसेवकही या बाबतीत सावध प्रतिक्रिया देतात. नगरसेवकांच्या पगारवाढीच्या प्रस्तावावर चर्चा झाली नसल्याचे महापौर सुरेंद्र फुर्तादो म्हणतात.
याविषयी पालिका आयुक्त संजित रॉड्रिग्स यांना विचारले असता त्यांनी सध्या तरी पगारवाढीच्या प्रस्तावावर चर्चा झाली नसल्याचे सांगितले. यातील सध्या तरी हा शब्द महत्त्वाचा म्हणजे पुढे होऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी झालेल्या बैठकीच्या मूळ कार्यक्रम पत्रिकेवर नगरसेवकांच्या पगारवाढीचा मुद्दा होता व ऐनवेळी तो काढला. कामगारांचा संप मिटला की नंतर हा प्रस्ताव पुढे रेटण्याचा निर्णय झाल्याची माहिती एका नगरसेवकानेच नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली. यालाच म्हणतात ना, सम आर मोअर इक्वल?

Web Title: Anchor Page 1 Corporators want 150% increase in salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.