काश्मीरच्या अनंतनागमध्ये भीषण अपघात; पाच मुलांसह ८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 16:02 IST2024-07-27T15:58:05+5:302024-07-27T16:02:48+5:30
अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच लहान मुलांचाही समावेश आहे.

काश्मीरच्या अनंतनागमध्ये भीषण अपघात; पाच मुलांसह ८ जणांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच लहान मुलांचाही समावेश आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या डाकसुम भागाजवळ वाहन उलटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमो गाडी जम्मू भागातील किश्तवाड येथून येत होती. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यावर उलटली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून त्यात पाच मुलं, दोन महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. याच दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.