गांधी कुटुंबातील एकही सदस्य अनंत-राधिकाच्या लग्नात सहभागी होणार नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 22:05 IST2024-07-11T22:04:37+5:302024-07-11T22:05:27+5:30

Anant Radhika Wedding: मुकेश अंबानी यांनी स्वतः सोनिया गांधी यांच्या घरी जाऊन लग्नाचे निमंत्रण दिले होते.

Anant Radhika Wedding: Invited by Mukesh Ambani himself; But no one from the Gandhi family will attend Anant-Radhika's wedding | गांधी कुटुंबातील एकही सदस्य अनंत-राधिकाच्या लग्नात सहभागी होणार नाही, कारण...

गांधी कुटुंबातील एकही सदस्य अनंत-राधिकाच्या लग्नात सहभागी होणार नाही, कारण...

Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चं उद्या, म्हणजे 12 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची तयारी सुरू असून, देश-विदेशातील नामांकित व्यक्ती या शाही सोहळ्यात हजेरी लावणार आहेत. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी स्वतः अनेकांच्या घरी जाऊन मुलाच्या लग्नाचे निमंत्रण दिले आहे. यात गांधी कुटुंबाचाही समावेश आहे. पण, गांधी कुटुंबातील कोणीही या लगाला उपस्थित राहणार नाही.

मुकेश अंबानी यांनी स्वत: निमंत्रण दिले होते 
मुकेश अंबानी यांनी 4 जुलै 2024 रोजी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अनंत आणि राधिकाच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते. यावेळी मुकेश यांनी संपूर्ण गांधी कुटुंबाला लग्नाला येण्याचे आवाहन केले होते. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार, या लग्नाला गांधी कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहणार नाही. याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

दरम्यान, गेल्या महिन्यात 26 जून रोजी मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन त्यांना त्यांच्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते. याशिवाय, त्यांनी बॉलिवूड, राजकारण, क्रीडा, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे. देश-विदेशातील अनेक दिग्गज अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तर गुरुवारी (11 जुलै) मुंबईला रवाना झाल्या आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा 12 जुलै रोजी मुंबईतील वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये होणार आहे. यानंतर 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलै रोजी भव्य स्वागत समारंभ आहे. 5 जुलै रोजी संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या जस्टिन बीबरनेही परफॉर्म केले होते. यानंतर 8 जुलै 2024 रोजी हळदीचा कार्यक्रम पार पडला. आता सर्वांच्या नजरा उद्या होणाऱ्या भव्य लग्न सोहळ्यावर आहेत.

Web Title: Anant Radhika Wedding: Invited by Mukesh Ambani himself; But no one from the Gandhi family will attend Anant-Radhika's wedding