रामराव अहेर स्मृतिदिनानिमित्त २७ पासून आनंद मेळावा
By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30
देवळा : देवळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कर्मवीर रामराव अहेर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव, येथे दि. २७ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, आनंद मेळावा, क्रिडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा आदि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना १ जानेवारी रोजी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्मृतिदिन समारंभ १ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार असून, विधान परिषद सदस्य आमदार डॉ. सुधीर तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

रामराव अहेर स्मृतिदिनानिमित्त २७ पासून आनंद मेळावा
द वळा : देवळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कर्मवीर रामराव अहेर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव, येथे दि. २७ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, आनंद मेळावा, क्रिडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा आदि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना १ जानेवारी रोजी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्मृतिदिन समारंभ १ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार असून, विधान परिषद सदस्य आमदार डॉ. सुधीर तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.