(निनाद) संगमनेरच्या उपसरपंचपदी रेश्मा बांदल
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:32+5:302015-08-31T00:24:32+5:30
कापूरव्होळ : संगमनेरच्या उपसरपंचपदी रेश्मा बांदल यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आय. एल. शेख यांनी दिली.

(निनाद) संगमनेरच्या उपसरपंचपदी रेश्मा बांदल
क पूरव्होळ : संगमनेरच्या उपसरपंचपदी रेश्मा बांदल यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आय. एल. शेख यांनी दिली. याप्रसंगी ए. डी. रोडे, तसेच ग्रामसेवक पी. जे. सोले तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाचे संचालक विलासराव बांदल, ग्रामस्थ तुकाराम बांदल, अनिल बांदल, प्रल्हाद बांदल, अशोक गाढवे, उत्तम गव्हाणे, नितीन बांदल, वसंत बांदल, शंकर धुमाळ उपस्थित होते. संगमनेर गावच्या सरपंच आरक्षण सोडतीत महिलांसाठी ६० टक्के आरक्षण व पुरुषांची संख्या ४० टक्क्यांवर आली. संगमनेर ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाले. परंतु आरक्षणात एकही अर्ज न आल्याने संगमनेर ग्रामपंचायतीला पुढील निवडणूक होईपर्यंत सरपंचांसाठी वाट पाहावी लागणार आहे. फोटो आहे : ०००००