(निनाद) आधारकार्डासाठी पैशांची वसुली गुन्हा दाखल करा : नगरसेवक पवार यांची मागणी
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:20+5:302015-08-27T23:45:20+5:30
दौंड : दौंडला आधारकार्ड नोंदविण्याच्या कामात १५० ते २०० रुपये नागरिकांकडून सक्तीने घेतले जात आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेवक नंदकुमार पवार यांनी केली आहे. दौंडला नागरिकांचे आधार नोंदणीचे काम जिजामाता विद्यालय गोपाळवाडी रोड व शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय तसेच दौंड तालुक्यातील इतर गावांमध्ये सुरू आहे. या ठिकाणी आधारकार्ड नोंदणीविणारे अधिकारी सक्तीने पैसे वसूल करत आहेत. आधारकार्ड नोंदणीचे काम राष्ट्रीय काम आहे व ते विनामोबदला केले जावे; परंतु पैसे घेऊन तालुक्यात हे काम जे कोणी करत आहेत त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे पवार यांनी केली आहे.

(निनाद) आधारकार्डासाठी पैशांची वसुली गुन्हा दाखल करा : नगरसेवक पवार यांची मागणी
द ंड : दौंडला आधारकार्ड नोंदविण्याच्या कामात १५० ते २०० रुपये नागरिकांकडून सक्तीने घेतले जात आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेवक नंदकुमार पवार यांनी केली आहे. दौंडला नागरिकांचे आधार नोंदणीचे काम जिजामाता विद्यालय गोपाळवाडी रोड व शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय तसेच दौंड तालुक्यातील इतर गावांमध्ये सुरू आहे. या ठिकाणी आधारकार्ड नोंदणीविणारे अधिकारी सक्तीने पैसे वसूल करत आहेत. आधारकार्ड नोंदणीचे काम राष्ट्रीय काम आहे व ते विनामोबदला केले जावे; परंतु पैसे घेऊन तालुक्यात हे काम जे कोणी करत आहेत त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे पवार यांनी केली आहे.----------------