शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अधुरी एक कहाणी! ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशीच जात-पात आणि अहंकाराने घेतले दोन बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 14:21 IST

Noida Crime News: शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी जगभरात प्रेमाचा दिवस असलेला व्हॅलेंटाइन डे साजरा होत असताना नोएडामध्ये एका बंद कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले प्रेमी युगुलाचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली.

शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी जगभरात प्रेमाचा दिवस असलेला व्हॅलेंटाइन डे साजरा होत असताना नोएडामध्ये एका बंद कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले प्रेमी युगुलाचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली. नोएडामधील सेक्टर-३९ मधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पांढऱ्या कारमध्ये सापडलेले हे मृतदेह  क्रिकेटपटू सुमित आणि त्यांची प्रेयसी रेखा यांचे होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पाहणी करून पुढील तपासाला सुरुवात केली. मात्र त्यानंतर जी काही माहिती समोर आली धक्कादायक होती. जात-पात आणि अंहकारामुळे या प्रेमी युगुलाचा बळी गेला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुमित आणि रेखा यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात दिल्लीमधील त्रिलोकपुरी येथील एका सरकारी शाळेमधून झाली होती. शालेय जीवनात दोघांमध्ये असलेली मैत्री हळुहळू प्रेमात बदलली होती. दोघांचेही कुटुंबीय एकमेकांना ओळखायचे. तसेच सुमित आणि रेखा यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. एवढंच नाही तर सुमित एक उत्कृष्ट क्रिकेटपटूही होता. दरम्यान, पदवी मिळवल्यावर रेखाने नोकरी करण्यास सुरुवात केली. तर सुमितने वडिलांच्या मदतीने एक वॉटर प्लँट सुरू केला होता. तसेच रेखाला भेट देण्यासाठी नोएडामध्ये एक कोटी रुपयांचा एक फ्लॅटसुद्धा खरेदी केला होता.

मात्र नियतीच्या मनात काही औरच होतं. २०१९ मध्ये सुमितचा भीषण अपघात झाला. त्यावेळी गंभीर जखमी झालेल्या सुमितची रेखाने मनापासून काळजी घेतली. तसेच यादरम्यान या दोघांमधील प्रेमसंबंधांची कुणकूण दोघांच्याही कुटुंबीयांना लागली. सुमितच्या कुटुंबीयांची या नात्याला मान्यता होता. मात्र रेखाचं कुटुंबं विरोधात होतं. त्याचं कारण म्हणजे सुमित वाल्मिकी समाजातील होता. तर रेखा कायस्थ होती. त्यानंतर रेखाच्या कुटुंबीयांनी ,सुमितला धमकावण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, २०२५ मध्ये रेखाच्या चुलत भावाने सुमितला पकडून त्याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तेव्हा सुमितने लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली आहे. रेखाशी माझा काही संबंध नाही. जर मी तिची छेड काढली किंवा तिला त्रास दिला तर माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे सुमितने लिहिलेले होते. त्याबरोबरच सुमितचं रेखाच्या कुटुंबीयांसोबत झालेलं सोशल मीडिया चॅटही समोर आलं आहे.

यादरम्यान, सुमित आणि रेखा यांनी भेटीगाठी कमी केल्या. मात्र त्यांच्या मनातील प्रेमभावना कायम होती. अखेर १३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमित त्याच्याकडील कारमधून निघाला. तसेच मी मरायला निघालो आहे, असा मेसेज त्याने केला. घाबरलेल्या रेखाने त्याला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये बोलावले.  त्यानंतर दोघेही कारमधून निघाले. मात्र इकडे संध्याकाळ झाली तरी रेखा घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली आणि ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली.

दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी सेक्टर-३९ पोलिसांना एक बेवारस कार उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन  पाहणी केली तेव्हा कारच्या काचा बंद असल्याचे दिसले. पोलिसांनी जेव्हा कारच्या काचा तोडून आत पाहिले, तेव्हा त्यांना धक्का बसला. कारमध्ये एक तरुण आणि तरुणी असे दोघांचे मृतदेह पडलेले होते. हे मृतदेह सुमित आणि रेखा यांचे होते. दोघांच्याही डोक्यात गोळ्या झाडलेल्या होत्या. तसेच सुमितच्या हातात पिस्तूल होती. त्यावरून सुमितने आधी रेखावर गोळी झाडून नंतर स्वत: जीवन संपवल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. आता पुढील तपास सुरू आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Valentine's Day Tragedy: Caste, Ego Claim Two Lives in Noida

Web Summary : On Valentine's Day in Noida, a couple was found dead in a car. Sumit and Rekha, in love since school, faced family opposition due to caste differences. The tragic end came after threats and immense pressure.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टUttar Pradeshउत्तर प्रदेश