शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

झब्बा-पायजमा शिवणार का?; नेमकं काय घडलं, दुकानात काम करणाऱ्यांनी सगळं सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:52 IST

पोलिसांनी दोन्ही आरोपींना राजसमंद जिल्ह्यातील भीमा परिसरातून अटक केली आहे.

नवी दिल्ली: राजस्थानच्या उदयपूरमध्ये काही कट्टरपंथीयांकडून टेलर व्यावसायिक कन्हैया लालचा गळा चिरून खून करण्यात आला. मंगळवारी दुपारी कपड्याच माप देण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद यांनी टेलर कन्हैयालालची निर्घृण हत्या केली. त्यानंतर, देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहेत. सोशल मीडियातूनही या दोघांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना राजसमंद जिल्ह्यातील भीमा परिसरातून अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीत ज्या लोकांची नावं येतील त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असं पोलीसांनी म्हटलं. उदयपूरच्या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी २४ तासांसाठी मोबाईल इंटरनेट बंद करण्यात आलं होतं. तसेच आणि सर्व जिल्ह्यांमध्ये एका महिन्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

कन्हैया लाल टेलरच्या हत्येचा हा सगळा प्रसंग त्यांच्यासोबत दुकानात काम करणारे सहायक गिरीश शर्मा यांनी सांगितला. मंगळवारी (२८ जून) दुपारी दोन-तीनच्या सुमारास दोन तरूण (मोहम्मद रियाज अत्तारी आणि गौस मोहम्मद) दुकानात आले. झब्बा-पायजमा शिवणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर कन्हैया लाल यांनी हो, शिवतो असं सांगितलं. त्यानंतर रियाज झब्बा-पायजम्याचं माप द्यायला लागला. गौस शेजारी उभा होता. 

मी आणि माझा दुसरा सहकारी दुकानात कपडे शिवत होतो. मला तेवढ्यात ओरडण्याचा आवाज आला. मी वळून पाहिलं, तर त्यांनी कन्हैया लाल यांच्यावर हल्ला केला होता. मी बाहेर पळालो. शेजारच्या दुकानात पोहोचल्यावर माझ्या लक्षात आलं की, माझ्या डोक्यातूनदेखील आणि डाव्या हातातूनही रक्त वाहायला लागलं होतं. शेठजी दुकानात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या शरीरातून रक्त वाहात होतं. माझ्यासोबत सहकारीही कसाबसा बाहेर पडला, असं त्यांनी सांगितलं. ॉ

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी