एका वृद्धाने आपल्या पाळीव कुत्र्याच्या स्मरणार्थ बांधले मंदिर, पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 13:57 IST2022-04-05T13:56:52+5:302022-04-05T13:57:37+5:30
tamil nadu : टॉमचे बनवलेले हे मंदिर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून लोक टॉमच्या मालकाचे कौतुक करत आहेत.

एका वृद्धाने आपल्या पाळीव कुत्र्याच्या स्मरणार्थ बांधले मंदिर, पाहा व्हिडिओ
माणसं अनेकदा आपल्या पाळीव प्राण्यांवर जगभर खूप प्रेम करतात, पण जेव्हा ते निघून जातात तेव्हा त्यांच्या आठवणीत अनेक गोष्टी करतात. अशीच एक बातमी तामिळनाडूतून समोर आली आहे. ज्यामध्ये एका 82 वर्षांच्या वृद्धाने आपल्या पाळीव कुत्र्याच्या स्मरणार्थ मंदिर बांधले आहे.
तामिळनाडूतील शिवगंगा येथील 82 वर्षीय मुथू यांनी आपला पाळीव कुत्रा टॉमच्या स्मरनार्थ आपल्या शेतात मंदिर बांधले आहे. मुथू हे गेल्या 11 वर्षांपासून पाळीव कुत्रा टॉमसोबत राहत होते आणि गेल्या वर्षी टॉमचा आजारपणामुळे मृत्यू झाला. टॉमच्या स्मरणार्थ मुथू यांनी हे मंदिर बांधले आहे. टॉमचे बनवलेले हे मंदिर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून लोक टॉमच्या मालकाचे कौतुक करत आहेत.
#WATCH तमिलनाडु: शिवगंगा में 82 वर्षीय मुथु ने अपने पालतू कुत्ते टॉम के लिए अपने खेत में मंदिर बनाया है। मुथु पिछले 11 वर्षों से अपने पालतू कुत्ते टॉम के साथ रह रहे थे, पिछले वर्ष बीमारी के कारण टॉम की मृत्यु हो गई थी। pic.twitter.com/XepMwbDoG2
— ANI_HindiNews (@AHindinews) April 5, 2022
दरम्यान, असे म्हणतात की जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत जास्त काळ राहता तेव्हा तुमची त्याच्याशी जवळीक वाढते. मुथू यांच्या बाबतीतही असेच घडले. इतके दिवस टॉम मुथूसोबत राहत होता. त्यामुळे टॉमवर मुथू यांनी जीव लावला होता.टॉमचा मृत्यू झाल्यावर हा धक्का मुथू यांना सहन झाला नाही आणि त्याच्या स्मरणार्थ त्यांच्या शेतात मंदिर बांधले.