भारतीय लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले, तीन जवान जखमी; रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 13:47 IST2023-05-04T13:46:49+5:302023-05-04T13:47:51+5:30
सदर घटनेची माहिती मिळताच लष्कराची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.

भारतीय लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले, तीन जवान जखमी; रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील मारवाह तालुक्यातील मछना गावाजवळ भारतीय लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघात झाला तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. यामध्ये तिघेही जखमी झाले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये पायलट, सह पायलट आणि एक जवान, असे तिघे जण होते. सदर घटनेची माहिती मिळताच लष्कराची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तिन्ही जखमी जवानांना उधमपूरमधील लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले.
An Army ALH Dhruv Helicopter crashed near Kishtwar, Jammu & Kashmir. Pilots have suffered injuries but are safe. Further details awaited: Army Officials. pic.twitter.com/ya41m7CRfn
— ANI (@ANI) May 4, 2023
यावेळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटने हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पायलटला यात यश आले नाही आणि हेलिकॉप्टर थेड मरुआ नदीच्या किनारी जाऊन कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघाताचा पुढील तपास सध्या संबंधित अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.