अमूलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अचानक दिला राजीनामा; जयन मेहता यांच्याकडे कारभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 08:07 IST2023-01-10T07:48:20+5:302023-01-10T08:07:04+5:30
नवी दिल्ली : भारतातील आघाडीच्या दूध उत्पादन कंपन्यांपैकी एक असलेल्या गुजरात काे-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या अर्थात ‘अमूल’च्या व्यवस्थापकीय ...

अमूलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अचानक दिला राजीनामा; जयन मेहता यांच्याकडे कारभार
नवी दिल्ली : भारतातील आघाडीच्या दूध उत्पादन कंपन्यांपैकी एक असलेल्या गुजरात काे-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या अर्थात ‘अमूल’च्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा आर. एस. साेधी यांनी अचानक राजीनामा दिला. गेल्या ४० वर्षांपासून ‘अमूल’च्या साेबत असलेले साेधी यांना सुमारे १२ वर्षांपूर्वी व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली हाेती.
साेधी यांच्या नेतृत्वात ‘अमूल’ची गाडी पुन्हा रुळावर आली हाेती. त्यांनी सप्लाय चेनमध्ये काही बदल केले. तसेच काही नवी उत्पादनेही बाजारात आणली हाेती. १९८२ मध्ये त्यांनी अमूलमध्ये काम सुरू केले हाेते. त्यानंतर २००० ते २००४ या कालावधीत ते कंपनीचे सरव्यवस्थापक पदावर हाेते. साेधी हे जुलै २०२२ मध्ये इंडियन डेअरी असाेसिएशनचे अध्यक्ष बनले हाेते.
मेहता यांच्याकडे कार्यभार
साेधी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. कंपनीचे सीईओ जयन मेहता यांच्यावर त्यांच्या पदाचा कार्यभार साेपविण्यात आला आहे. मेहता यांच्याकडे तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे.