अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 21:03 IST2025-04-30T21:01:03+5:302025-04-30T21:03:45+5:30

Amul Milk Price Hike: अमूल दुधाच्या किंमतींत दोन रुपयांनी वाढ झाल्याने सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

Amul hikes milk prices by Rs 2 per litre, check out new prices for all variants | अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!

अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!

अमूलने दुधाच्या किमतींत वाढ करण्याची घोषणा केली आहे. देशभरात दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अमूलने सांगितले. नवीन दर उद्या सकाळपासून म्हणजेच १ मे पासून लागू होतील. आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांसाठी मोठा झटका आहे.

अमूलचे मुख्यालय गुजरातमधील आणंद जिल्ह्यात आहे. खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने जारी केलेल्या निवेदनात दुधाच्या दरात वाढ झाल्याची माहिती देण्यात आली. 'अमूल दुधाच्या नवीन किंमती देशभरातील पॅकवर छापल्या जातील आणि त्या विक्री किंमती म्हणून विचारात घेतल्या जातील', असे निवेदनात म्हटले आहे.

वाढलेल्या किमतींचा परिणाम अमूल स्टँडर्ड मिल्क, बफेलो मिल्क, गोल्ड, स्लिम अँड ट्रिम, टी-स्पेशल, ताजा आणि गायीचे दूध यासारख्या प्रमुख उत्पादनांवर होईल. म्हशीचे फुल क्रीम दूध जे आधी ३६ रुपयांना ५०० मिली मिळत होते, ते आता ३७ रुपयांना मिळणार आहे. तर, एक लीटर दूधासाठी ७१ रुपयांऐवजी ७३ रुपये द्यावे लागतील.

याआधी मदर डेअरीने दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर २ रुपयांपर्यंत वाढ केली. आजपासून नव्या किंमती लागू झाल्या. मदर डेअरीचे दूध उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड आणि बिहारसह इतर राज्यांमध्येही विकले जाते. 'खरेदी खर्चातील लक्षणीय वाढ भरून काढण्यासाठी किंमतीत सुधारणा आवश्यक आहे', असे मदर डेअरीच्या अधिकाऱ्याने मंगळवारी रात्री उशिरा सांगितले.

Web Title: Amul hikes milk prices by Rs 2 per litre, check out new prices for all variants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध