मानवी देहातच अमृताचा कुंभ : हरिसंतोषानंद

By Admin | Updated: August 25, 2015 22:46 IST2015-08-25T22:46:48+5:302015-08-25T22:46:48+5:30

नाशिक : अमृताचा झरा इतरत्र कोठेही नसून मानवी देहातच तो निरंतर पाझरतो आहे. मानवी शरीरात असलेल्या या अमृताच्या कुंभाचा अनुभव सद्गुरुद्वारे आत्मज्ञान प्राप्ती करणार्‍याला मिळू शकतो, असे प्रतिपादन महात्मा हरिसंतोषानंद यांनी केले.

Amruta's Aquarius: HariSisantoshand | मानवी देहातच अमृताचा कुंभ : हरिसंतोषानंद

मानवी देहातच अमृताचा कुंभ : हरिसंतोषानंद

शिक : अमृताचा झरा इतरत्र कोठेही नसून मानवी देहातच तो निरंतर पाझरतो आहे. मानवी शरीरात असलेल्या या अमृताच्या कुंभाचा अनुभव सद्गुरुद्वारे आत्मज्ञान प्राप्ती करणार्‍याला मिळू शकतो, असे प्रतिपादन महात्मा हरिसंतोषानंद यांनी केले.
हरिसंतोषानंद यांनी सांगितले की, मानवाला अनादि काळापासून मृत्यूचे भय असून, अमृताचे अप्रुप आहे. सद्गुरूच्या सान्निध्यात त्याला अमृतपानाच्या क्रि यात्मकतेचा बोध होतो. तो ब्रšारंध्रांतून स्त्रवणार्‍या अमृताचे प्राशन करू शकतो. या साधनेलाच आत्मविद्या, अध्यात्मविद्या, प्राणविद्या, मधुविद्या, अमरविद्या, ब्रšाविद्या, परमात्माविद्या किंवा राजविद्या असे म्हटले गेले. या विद्येचे ज्ञान देणार्‍याला सदगुरू म्हणतात.
याप्रसंगी दिल्लीतील श्री हंस सत्संग भवनचे प्रबंधक महात्मा कमलेशानंदजी म्हणाले, सेवा, सत्संग, ध्यानधारणा आणि भक्ती हाच मनुष्य जन्माचा उद्देश असायला हवा. ईश्वर साधना अविनाशी असून, तीच जीवनातील खरी कमाई आहे.
श्री सत्पालजी महाराज यांच्या मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने आयोजित सद्भावना शिबिरास शनिवार (दि. २९) पासून प्रारंभ होत आहे. २९ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी चार ते सात या वेळेत या ठिकाणी संत्संग होणार आहे. त्यासाठी आत्मानुभवी महात्मा तसेच महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश आदि राज्यांतील भाविक शहरात दाखल होऊ लागले आहेत.
याप्रसंगी महात्मा हरिसंतोषानंद, मानव उत्थान सेवा समितीच्या दिल्ली आश्रमाचे प्रबंधक महात्मा कमलेशानंद, नागपूर आश्रमाच्या प्रबंधक साध्वी मैत्रेयीजी, नाशिक आश्रमाच्या प्रबंधक साध्वी आराधनाजी, गौतम भंदुरे, हिरामण सूर्यवंशी, जे. सी. गांगुर्डे, दीपक मौले, भगीरथ मंडलिक, दादा पाटील, विजय भंदुरे, पांडुरंग बोराडे, प्रशांत काश्मिरे आदिंसह मानवधर्म प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Amruta's Aquarius: HariSisantoshand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.