गर्भवती महिलांसाठीची रक्कम थेट त्यांचा खात्यात जमा होणार

By Admin | Updated: February 1, 2017 11:57 IST2017-02-01T11:52:59+5:302017-02-01T11:57:17+5:30

गर्भवती महिलांना सहा हजार रुपये मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबरला देशाला उद्देशून केलेल्या

The amount of money for pregnant women will be directly deposited in their account | गर्भवती महिलांसाठीची रक्कम थेट त्यांचा खात्यात जमा होणार

गर्भवती महिलांसाठीची रक्कम थेट त्यांचा खात्यात जमा होणार

>ऑनलाईन लोकमत
 नवी दिल्ली, दि. 1 - गर्भवती महिलांना सहा हजार  रुपये मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबरला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली होती. ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होणार होणार आहे. अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणातून दिली. तसेच महिलांसाठी अंगणवाडीच्या माध्यमातून 500 कोटी रुपये खर्च करण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 

Web Title: The amount of money for pregnant women will be directly deposited in their account